IPS Success Story | सिमालाच्या नावाने गुन्हेगारांचा उडतो थरकाप; चित्रपटांमध्येही केले काम, जाणून घ्या यशाची गोष्ट
आयपीएस अधिकारी सिमाला प्रसाद (IPS Officer Simala Prasad)यांनी आपले शिक्षण जोसेफ कोएड स्कूलमध्ये केले होते. त्यानंतर त्यांनी `स्टुडंट फॉ़र एक्सिलंस` मधून बीकॉम केले आणि पुन्हा भोपालच्या बरकतउल्ला युनिवर्सिटीमधून सोशलॉजीमध्ये पीजी केले. तेथे त्या गोल्ड मेडलिस्ट होत्या.
नवी दिल्ली : संघ लोकसेवा आयोगाच्या सिविल परीक्षेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांची गोष्ट इतरांसाठी प्रेरणादायी बनते. त्यामागे त्यांची प्रचंड मेहनत तसेच जिद्द असते. अशीच एक गोष्ट आयपीएस अधिकारी सिमाला प्रसाद यांची आहे. सिमाला यांचा जन्म 8 ऑक्टोबर 1980 रोजी मध्य प्रदेशातील राजधानी भोपालमध्ये झाला होता. ते मध्य प्रदेश केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. सिमाला नक्सली क्षेत्रात आपल्या कणखर बाण्यासाठी ओळखल्या जातात.
बरकतउल्ला विद्यापिठातून पोस्ट ग्रॅज्युएट
आयपीएस अधिकारी सिमाला प्रसाद यांनी आपले शिक्षण जोसेफ कोएड स्कूलपासून सुरू केले. त्यानंतर त्यांनी स्टुडंट फॉर एक्सिलंसमधून बीकॉम पूर्ण केले. तसेच भोपालच्या बरकतउल्ला विद्यापिठातून सोशलॉजीमध्ये पीजी केले. तेथे ती गोल्ड मेडलिस्ट होती.
DSP पदी काम
आयपीएस होण्याआधी सिमाला राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन पहिली पोस्टिंग डीएसपी पदावर कार्यरत होत्या. याच दरम्यान 2010 मध्ये त्यांनी युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली आणि आयपीएस होण्याचा मान मिळवला.
स्वयंअध्ययनावर भर
डीएसपी पदावर असताना त्यांनी युपीएससी सिविल परीक्षेची तयारी सुरू ठेवली. सेल्फ स्टडी करून पहिल्याच प्रयत्नात त्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली. सिमाला यांचे म्हणणे आहे की, सिविल सर्विसेस परीक्षेला योग्य मार्गदर्शन आणि सेल्फ स्टडीवर भर देणे गरजेचे असते. त्याआधी उमेदवारांनी अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्नचे ऍनालिसिस करणे अत्यंत आवश्यक आहे.
सिमाला यांचे चित्रपटातही काम
सिमाला प्रसाद यांनी अलिफ चित्रपटात शम्मीची भूमिका बजावली आहे. हा चित्रपट नोव्हेंबर 2016 मध्ये इंडियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ क्विसलॅडमध्ये प्रीमियर प्रदर्शित झाला होता.