Egg Price Hike : हिवाळ्यामध्ये  (winter) अंडी खाल्ली पाहिजे असं डॉक्टर आणि आहार तज्ज्ञ सांगतात. खरं तर संडे असो वा मंडे रोज अंडी (Egg) खाल्ली पाहिजे. मात्र ऐन थंडीमध्ये अंड्याचा भाव वधारला (price increased) आहे. थंडीमध्ये अंडी खाण्याचं प्रमाण वाढतं कारण अंडी ही उष्ण असतात. कडाक्याच्या थंडीत अंडी खाल्ल्यामुळे शरीराचं तापमान नियंत्रणात राहतं. पण ऐन थंडीत अंडी महागली आहे. 


किती रुपयाने महागली? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रति डझन अंड्यांच्या दरात 6 रूपये वाढ झालीय. हिवाळ्यात सकस आहार म्हणून अंड्यांना पसंत मिळते. त्यामुळे दर हिवाळ्यात अंड्यांचा खप वाढतो. यावर्षी अंड्यांची मागणी पाचपट वाढली आहे. तरदुसरीकडे बाजारातील तज्ज्ञानुसार भारतीय अंडे सर्वात महागडे उत्पादन ठरलं आहे. इंग्लंड (England ) आणि मलेशियातून (Malaysia) अंडे विक्रीत कमी येत असल्याने भारतीय अंड्यांना प्रचंड मागणी आली आहे. (Eggs became price increased Rs 6 per dozen on winter)


 


हेसुद्धा - Weather Forecast : आजची रात्र वैऱ्याची! चक्रीवादळामुळं किनारपट्टी भकास; महाराष्ट्रातील 'या' भागांत मुसळधार पावसाची शक्यता


 
शेअर मार्केटवरही परिणाम


चीन अंडे उत्पादनात पहिला तर भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. दरवर्षी भारतात 11,440 कोटी अंड्यांचं उत्पादन होतं. कतारमध्ये फीफा वर्ल्ड कपमुळे (fifa world cup 2022) भारतीय अंडे निर्यात करणाऱ्यांची चांदी होतं आहे.  भारतातून कताराला 10 कंटेनर जात होते.



पण फिफा वर्ल्डकपमुळे 40 कंटेनर अंडी निर्यात होत आहेत. त्यामुळे भारतात अंड्याची कमतरता भासण्याची शक्यता आहे. याचे परिणाम अंड्याची अजून भाववाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा परिणाम Venkys आणि SKM Eggs या शेअरवर दिसणार आहेत. त्यामुळे शेअर मार्केट तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे की, या दोन कंपन्यांवर नजर ठेवा, कारण यांचे भाव वाढण्याची शक्यता आहे.