झारखंडमध्ये दाट धुक्यामुळे वाहनांची एकमेकांना धडक, ८ जणांचा मृत्यू
बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्ये तापमानाचा पारा चांगलाच घसरतोय. दाट धुक्यामुळे तेथील वाहतुकीवरही परिणाम होतोय. दाट धुक्यामुळे तेथील लोकांना रस्त्यावर चालणेही अवघड झालेय.
रांची : बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्ये तापमानाचा पारा चांगलाच घसरतोय. दाट धुक्यामुळे तेथील वाहतुकीवरही परिणाम होतोय. दाट धुक्यामुळे तेथील लोकांना रस्त्यावर चालणेही अवघड झालेय.
रविवारी दाट धुक्यामुळे झारखंडमधील दुमका येथे दोन वाहनांची एकमेकांना धडक बसून भीषण अपघात झाला. या अपघातात ८ जणांचा मृत्यू तर २ जण जखमी झालेत. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांची तात्काळ तेथे धाव घेतली आणि मदतकार्य सुरु केले.
पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांचे मृतदेह पोस्ट मार्टेमसाठी पाठवण्यात आलेत. रविवारी सकाळी एक ट्रक आणि जीप यांची समोरासमोर धडक हसली. ही धडक इचकी भीषण होती की यात ८ जणांचा मृत्यू झाला.
याआधी शुक्रवारीच दुमकामध्ये आणखी एक रस्ते अपघात झाला होता. शुक्रवारी सकाळी जामताड़ा-दुमका हायवेवर वृत्तपत्रे घेऊन येणारी व्हॅन आणि हायवा यांच्यात टक्कर झाली. या अपघातात दोन जण जखमी झाले होते.