एटा, उत्तरप्रदेश : कठुआ आणि सूरतमध्ये घडलेल्या देशाला हादरवून टाकणाऱ्या घटनेची पुनरावृत्ती उत्तरप्रदेशातल्या एटामध्ये घडलीय. एका अवघ्या आठ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार  केल्यानंतर तिची क्रूरपणे हत्या करण्यात आल्याचं समोर येतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी 16 एप्रिल रोजी रात्री जवळपास दीड वाजल्याच्या सुमारास घडली. पीडित चिमुरडी आपल्या कुटुंबीयांसोबत एका विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी इथं दाखल झाली होती. या दरम्यान नशेच्या अंमलाखाली असलेल्या आरोपीनं चिमुरडीचं अपहरण केलं... त्यानंतर त्यानं तिच्यावर बलात्कार केला आणि गळा दाबून हत्या करून घटनास्थळावरून फरार झाला. 


या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी उपस्थित झाले. काही वेळातच त्यांनी आरोपीला अटक केली. आरोपी कार्यक्रमांसाठी घातल्या जाणारे मंडप लावण्याचं काम करतो. आरोपीनं आपल्या निंदनीय कृत्याची कबुली दिलीय. 



ही घटना घडली त्यावेळी विवाह समारंभातील काही विधी सुरू होते... आणि लग्नघर संगितानं दुमदुमून गेलं होतं... सर्व लोक लग्नसोहळ्यात व्यस्त होते. त्याचवेळी सोनू नावाच्या आरोपीनं अल्पवयीन मुलीला उचलून बाजुच्या गल्लीत नेलं... आणि तिथं काम सुरु असलेल्या एका घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. 


बराच वेळ चिमुरडी दिसली नाही तेव्हा कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचली आणि आरोपीला अटक केली... मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आलाय.