गुजरात : गुजरात निवडणुकीत मोठा ईव्हीएम घोटाळा होणार असल्याचा आरोप पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याने केला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान गुजरात निवडणुक निकालाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगातर्फे मोठा खुलासा करण्यात आला आहे. 


हार्दिकचा आरोप



गुजरात निवडणूकीत भाजपाला मिळणाऱ्या यशाबद्दल हार्दिक पटेलने शंका व्यक्त केली होती.



अहमदाबाद येथील एका कंपनीतील १४० सॉफ्टवेअर इंजीनियरांकडे ५०० ईव्हीएम मशीन हॅक करणारे सोर्स कोड असल्याचा आरोप हार्दीक पटेलने केला होता. 


'छेडछाड नाही' 



ईव्हीएमसोबत कोणतीच छेडछाड केली जाऊ शकत नसल्याचे मुख्य निर्वाचन आयुक्त अचल कुमार यांनी सांगितले. आहे. 



पोलिंग स्टेशनवर वीवीपॅट्स



ईव्हीएम संदर्भात उठणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आम्ही याआधीच मीडियाला दिली आहेत. गुजरातच्या प्रत्येक पोलिंग स्टेशनवर वीवीपॅट्स लावले गेले होते. ज्यामूळे कोणाला किती मतदान झाले हे समजू शकते. यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नसेल. ईव्हीएममध्ये कोणतीच छेडछाड झाली नसल्याचा विश्वास अचल कुमार यांनी दिला.