नवी दिल्ली: राज्यसभेच्या २ जागांसाठी पोट-निवडणुकीची निवडणूक आयोगाने घोषणा केली आहे. या दोन जागांसाठी २४ ऑगस्टला निवडणूक घेणार असल्याचं आयोगाने जाहीर केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशमधील खासदार बेनी प्रसाद वर्मा आणि केरळमधील खासदार वीरेंद्र कुमार यांच्या निधनानंतर या जागा रिक्त झाल्या होत्या. या दोन्ही जागेचा कार्यकाळ २०२२ पर्यंत आहे. त्यामुळे येथे पोटनिवडणूक होत आहे.



निवडणूक आयोग या पोटनिवडणुकीसाठी नोटिफिकेशन ६ ऑगस्टला जाहीर करेल. त्यानंतर उमेदवारीसाठी १३ ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येईल.


अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख १७ ऑगस्ट असेल. सकाळी ९ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होईल आणि त्याच दिवशी मतमोजणी देखील होईल.