ECI | पाच राज्यात निवडणुकीची रणधुमाळी, थोड्याच वेळात वेळपत्रक येणार
यूपी, पंजाबसह देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक निवडणूक आयोग (Election Commission) आज (8 जानेवारी) जाहीर करणार आहे.
मुंबई : यूपी, पंजाबसह देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक निवडणूक आयोग (Election Commission) आज (8 जानेवारी) जाहीर करणार आहे. निवडणूक आयोग थोड्याच वेळात म्हणजेच 3 वाजून 30 मिनिटांनी पत्रकार परिषद घेणार आहे. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) , पंजाब (Punjab) , उत्तराखंड (Uttarakhand) , गोवा (Goa) आणि मणिपूर (Manipur) या 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकींचं वेळापत्रक जाहीर होताच पाचही राज्यात आचारसहिंता (Code Of Conduct ) लागू होईल. (election commission of india will announce dates of punjab manipur goa uttarakhand and uttar pradesh 5 state assembaly election)
या पाच राज्यात 2017 मध्ये 3 जानेवारीला निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. तर यावेळेस 8 जानेवारीला निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर होणार आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमध्ये 4-5, पंजाबमध्ये 1-2, आणि मणिपूरमध्ये 1-2 टप्प्यांमध्ये निवडणुका होऊ शकतात.
उत्तर प्रदेशमध्ये 15 कोटी मतदार
उत्तर प्रदेशमध्ये 2017 मधील विधानसभा निवडणूक एकूण 7 टप्प्यात पार पडली होती. यूपीत यावेळेस एकूण 15 कोटी मतदार हे आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
निवडणूक रॅलीला परवानगी मिळणार?
देशावर कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा धोका आहे. त्यामुळे ओमायक्रॉन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या 5 राज्यांमध्ये निवडणूक रॅलीला परवानगी मिळणार की नाही, हे ही स्पष्ट होईल.
या निवडणुकांकडे आगामी लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल म्हणून पाहिलं जात आहे. त्यामुळे या 5 राज्यांमधील स्थानिक आणि राष्ट्रीय पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे.