`या` 15 धनाढ्य मंडळींनी खरेदी केले होते दीडशे कोटींचे Electoral Bonds
Electoral Bonds : निवडणूक रोखे प्रकरणी बरीच गोपनीय माहिती समोर असून, आता नेमके कोणी निवडणूक रोखे खरेदी केले त्यांची नावंही समोर आली आहेत.
Electoral Bonds : निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार सध्या निवडणूक रोखे प्रकरणी बरीच महतत्वाची आणि गोपनीय माहिती समोर आली आहे. राडजकीय देणगीसंदर्भातील या माहितीनुसार एप्रिल 2019 ते जानेवारी 2024 दरम्यानच्या काळात साधारण 333 जणांनी 358.91 कोटी रुपयांच्या निवडणूक रोख्यांची खरेदी केली. इंडियन एक्स्प्रेसनं प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार या 333 जणांपैकी 15 जण असेही आहेत ज्यांची नावं बऱ्याच मोठ्या व्यावसायिक संस्थांशी जोडली गेली आहेत. या 15 जणांनी साधारण 158.65 कोटी रुपयांच्या निवडणूक रोख्यांची खरेदी केली असं तपशीलातून समोर येत आहे.
कोण आहेत निवडणूक रोखे खरेदी करणारी ही मंडळी?
लक्ष्मी निवास मित्तल- 35 कोटी रुपये
आर्सेलर मित्तलच्या सीईओपदी असणाऱ्या लक्ष्मी निवास मित्तल यांनी 18 एप्रिल 2019 रोजी हे रोखे खरेदी केले. त्यांची कंपनी ही देशातील सर्वात मोठ्या स्टील उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे.
लक्ष्मीदास वल्लभदास मर्चंट- 25 कोटी रुपये
रिलायन्सच्या संपर्कात असणाऱ्या लक्ष्मीदास वल्लभदास मर्चंट यांनी नोव्हेंबर 2023 मध्ये निवडणूक रोखे खरेदी केले होते.
राहुल भाटिया- 20 कोटी रुपये
इंडिगोचे प्रमुख प्रचारक असणाऱ्या राहुल भाटिया यांनी एप्रिल 2021 मध्ये निवडणूक रोखे खरेदी केले होते. इथं त्यांनी हा व्यवहार वैयक्तिक पातळीवर केला तर, इंडिगो एंटिटीज- इंटरग्लोब एविएशन, इंटरग्लोब एयर ट्रांसपोर्ट आणि इंटरग्लोब रियल स्टेट वेंचर्सकडून 36 कोटींच्या रोख्यांची खरेदी करण्यात आली होती.
इंदर ठाकुरदास जयसिंघानी- 14 कोटी
पॉलीकॅब ग्रुप ऑफ कंपनीजच्या अध्यक्षपदी असणाऱ्या इंदर ठाकुरदास जयसिंघानी यांनी ऑक्टोबर 2023 मध्ये हे निवडणूक रोखे खरेदी केले होते.
राजेश मन्नालाल अग्रवाल- 13 कोटी
अजंता फार्मा लिमिटेडची मालकी असणाऱ्या आणि याच कंपनीच्या सहसंस्थापकपदी असणाऱ्या राजेश मन्नालाल अग्रवाल यांनी जानेवारी 2022 आणि ऑक्टोबर 2023 मध्ये निवडणूक रोखे खरेदी केले होते. त्यांच्या कंपनीनंही 4 कोटींचे निवडणूक रोखे खरेदी केले होते.
हेसुद्धा वाचा : लहानपणीचे फोटो अपलोड करताय? सावध व्हा, एका क्षणात ब्लॉक होईल तुमचं अकाऊंट
निवडणूक रोखे खरेदी करणाऱ्यांमधील उर्वरित नावं
हरमेश राहुल जोशी आणि राहुल जगन्नाथ जोशी- प्रत्येकी 10 कोटी रुपये
किरण मजूमदार शॉ- 6 कोटी रुपये
इंद्राणी पटनायक- 5 कोटी रुपये
सुधाकर कंचारला- 5 कोटी रुपये
अभ्रजीत मित्रा- 4.25 कोटी रुपये
सरोजीत कुमार डे- 3.4 कोटी रुपये
दिलीप रमनलाल ठाकर- 3 कोटी रुपये
प्रकाश बळवंत मेंगणे- 3 कोटी रुपये
निर्मल कुमार बथवाल- 3 कोटी रुपये