जुगाड करून मोटारसायकलला बनवले इलेक्ट्रिक बाईक; आता फक्त 10 रुपयांत चालते 50 किमी...
तेलंगानाच्या विद्यासागर या व्यक्तीने यावर शक्कल लढवली. आणि आपल्या पेट्रोल बाईकला इलेक्ट्रिक बाईकमध्ये कनवर्ट केले.
हैद्राबाद : पेट्रोल डिझेलच्या किंमती रोजच वाढत आहेत. ज्यामुळे महागाई देखील वाढत आहे. लोकांची उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी परिस्थित झाली आहे. तेलंगानाच्या विद्यासागर या व्यक्तीने यावर शक्कल लढवली. आणि आपल्या पेट्रोल बाईकला इलेक्ट्रिक बाईकमध्ये कनवर्ट केले.
विद्यासागरची आर्थिक स्थिती बेताची आहे. त्यात लॉकडाऊनमुळे कुटूंबाच्या गरजा पूर्ण करणे देखील कठीण होऊन बसले आहे. आता पेट्रोलच्या किंमतीही वाढल्या त्यामुळे दररोज 2 लीटर पेट्रोलची किंमत विद्यासागरला परवडण्यासारखे नव्हते. यापरिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी त्यांनी शक्कल लढवली.
विद्यासागर यांनी थोडीफार रक्कम जमा केली. त्यातून एक मशीन खरेदी केले. त्याने बाईकला इलेक्ट्रिक बाईकमध्ये कनवर्ट केले. ही मशीन त्याने 7500 रुपयाला ऑनलाईन खरेदी केली. मशीन पेट्रोल टॅंकच्या खाली लावून 30 एएस क्षमतेच्या बॅटरीला जोडण्यात आले. विद्यासागर म्हणतात की या बॅटरीला चार्ज व्हायला 5 तास लागतात. चार्जिंग साठी एक युनिट विज खर्च होते. एकदा चार्ज झाल्यानंतर ही बाईक 50 किलोमीटर चालते.