मुंबई : भारतात सध्या इलेक्ट्रिक स्कूटरचा बोलबाला वाढला आहे. त्यामुळे अनेक कंपन्या आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणत आहेत. त्यामुळे तु्म्हाला आवडीची डिझाईन आणि परवडणाऱ्या किंमतीत कोणती स्कूटर मिळू शकते. याबाबत आम्ही माहिती देत आहोत.


Hero Electric Photon


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये एक वेरिएंट येतो. ज्याची दिल्लीतील किंमत 78000 रुपये आहे. ही एकदा पूर्ण चार्ज केल्यास 122 किमीपर्यंत धावू शकते. या स्कूटरचा टॉप स्पीड 42 किमी प्रति तास इतकी आहे. तसेच पूर्ण चार्ज होण्यास 4-5 तासांचा वेळ लागतो.


Hero Electric Optima HX :



या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये दोन बॅटरी आहेत. एकाच वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. स्कूटरची दिल्लीतील किंमत 69000 रुपये आहे.


एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 122 किलोमीटरपर्यंत धावू शकते. या स्कूटरची टॉप स्पीड 42 किलोमीटर प्रति तास इतकी आहे. एकदा पूर्ण चार्ज करण्यासाठी 4-5 तासांचा वेळ लागतो


OLA S1:



ओलाच्या या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 91 हजार रुपये इतकी आहे. एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर 121 किलोमीटरपर्यंत धावू शकते. या स्कूटरचा टॉप स्पीड 90 किलोमीटर प्रती तास आहे. एकदा पूर्ण चार्ज होण्यासाठी 5 तासांचा वेळ लागतो.


OLA S1 Pro:



या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत दिल्लीत 114000 रुपये इतकी आहे. ही एकदा पूर्ण चार्ज झाल्यानंतर 181 किलोमीटर पर्यंत धावू शकते. या स्कूटरचा टॉप स्पीड 115 किमी प्रती तास इतकी आहे. एकदा पूर्ण चार्ज होण्यासाठी 6 तास 30 मिनिटांचा वेळ लागतो.


PURE EV EPluto 7G:



ही इलेक्ट्रिक स्कूटर एकाच वेरिएंटमध्ये बाजारात उपलब्ध आहे. दिल्लीत स्कूटरची किंमत 83700 रुपये इतकी आहे. एकदा पूर्ण चार्ज झाल्यानंतर  120  किमी पर्यंत धावू शकते. या स्कूटरचा टॉप स्पीड 60 किमी प्रति तास इतकी आहे. एकदा पूर्ण चार्ज होण्यासाठी 4 तासांचा वेळ लागतो.


Okinawa i-Praise:



ओकीनावा ही भारतातील इलेक्ट्रिक स्कूटर बनवणारी आघाडीची कंपनी आहे. कंपनीच्या या स्कूटरची किंमत 120000इतकी आहे. ही स्कूटर एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर 139 किमीपर्यंत धावू शकते. स्कूटरचा टॉप स्पीड 60 किलोमीटर प्रति तास इतका आहे.