How To Reduce Electricity Bill: उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात विजेचा सर्वाधिक वापर होतो. वीज बिल जास्त येण्याच्या भीतीने लोक विजेचा वापर कमी करु लागतात. मात्र, एवढे करुनही वीज बिल हजारात येते. त्यामुळे त्यांना टेन्शन येते. आपण अनेकवेळा नकळत अशा गोष्टी करतो, ज्यामुळे विजेचा विनाकारण वापर होतो. काही गोष्टींची काळजी घेतली तर वीज बिल निम्म्याने कमी होईल. आज आम्ही तुम्हाला वीज कमी करण्याचे काही सोपे उपाय सांगत आहोत, त्याचे पालन केले तर तुमचे वीज बिल कमी येईल आणि तुमचे टेन्शन कमी होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घरचे वीज बिल भरमसाठ आले तर तुम्ही डोक्याला हात मारता. वीज बिलात वाढ म्हणजे बजेटमध्ये घोळ. जर तुम्हालाही जास्त वीज बिलाचा सामना करावा लागत असेल तर घरातील काही बदल तुम्हाला फायदेशीर ठरतील. वीज बिल कमी करण्यासाठी तुम्हाला काही उपकरणे बदलावी लागतील. (हेही वाचा - थंडीत गिझरची सुट्टी! 500 रुपयांत संपूर्ण कुटुंबाचे होणार काम; बाथरुममध्ये ठेवा हे छोटे उपकरण )


एलईडी बल्ब वापरा


तुमच्या घरात जुने बल्ब असतील तर ते लगेच काढून टाका. जुने बल्ब जास्त वीज वापरतात. या बल्बऐवजी तुम्ही एलईडी बल्ब वापरु शकता. त्यामुळे विजेचा वापर कमी आणि बिल जास्त येणार नाही. 


हिटरने पाणी गरम करु नका


विजेची जास्त बिल येण्यास हिटरही कारणीभूत असतो. तुमच्या घरात उच्च क्षमतेचे हिटर बसवलेले असतील तर ते लगेच काढून टाका. उच्च क्षमतेचे हीटर जास्त वीज वापरतात. तुम्ही हिटरऐवजी ब्लोअर वापरु शकता कारण ते हिटरपेक्षा कमी वीज वापरते. त्यामुळे तुमच्या विजेची बचत होईल आणि बिलही कमी होईल.


वीज बिल फारसे येणार नाही


एक काळ असा होता की गिझर रॉडने पाणी तापवले जात असे. त्यावेळी गिझर इतके लोकप्रिय नव्हते. मात्र रॉडमुळे अनेक अपघातही झालेत. पण आता तंत्रज्ञानात खूप प्रगती झाली आहे. आता सुरक्षित इमर्शन रॉड बाजारात आले आहेत. रॉडला पाण्यात टाकल्यानंतरही विजेचा झटका बसत नाही. हा रॉड आयएसआय ( ISI) मार्कसह येतो आणि सुरक्षा स्तर कोटिंगसह येतो. इमर्शन रॉड 1500W द्वारे वीज वापरली जाते. इमर्शन रॉड वापरुनही वीज बिल फारसे येणार नाही.