मुंबई : सोन्यापेक्षाही कुठली गोष्ट महाग असते का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर या प्रश्नांचे उत्तर नक्कीच हा आहे, कारण सोन्यापेक्षाही अशा अनेक गोष्टी ज्या खुप महाग असतात. यामध्ये हत्तीच्या दातांचा समावेश होतो. मात्र तुम्हाला माहितीय का सोन्यापेक्षाही हस्तिदंत खुप महाग असते. मात्र यामागचे कारण काय जाणून घेऊयात.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दागिन्यांसाठी उपयोग 
दागिने बनवण्यासाठी हत्तीचे दात वापरले जातात. यातून गळ्यात घालण्यासाठी हार, मनगटात घालण्यासाठी बांगड्या, बटणे असे दागिने बनवले जातात.विशेषत: उच्चभ्रू लोकांमध्ये तर तो स्टेटस सिम्बॉलचाही विषय आहे.त्यामुळे तो महाग झाला आहे.


इतिहासाशी नाळ
हस्तिदंतापासून बनवलेले दागिने प्राचीन काळापासून वापरात आहेत. अगदी जुन्या काळातही राजघराण्यातील आणि उच्चभ्रू लोकांमध्ये यापासून बनवलेल्या दागिन्यांना मोठी मागणी होती. अनेक विशेष ठिकाणी, तो सामान्य संस्कृतीचा भाग होता. हे देखील कारण आहे की हस्तिदंत सोन्यापेक्षा महाग आहे.


धार्मिक कारण 
धार्मिक कारणांमुळे आणि अंधश्रद्धेमुळेही हत्तीच्या दातांना मागणी असते. हिंदू देवता श्री गणेशाला हत्तीच्या चेहऱ्याच्या रूपात चित्रित केले आहे. ज्यामध्ये हस्तिदंताचे दात बाहेर येताना दिसतात. त्यामुळे हिंदूंमध्येही याला मोठी मागणी आहे.


दरम्यान वरील ही प्रमुख कारणे आहेत, ज्यामुळे सोन्यापेक्षाही हत्तीची दात महाग असतात.