मोठ्या हत्तीची छोटी गोष्ट! 45 सेकंदाचा Viral Video एकदम कमाल
जंगलातील सर्वात महबलाढ्य प्राणी अशी हत्तीची ओळख. म्हणूनच तर वाघही हत्तीच्या नादाला लागत नाही. हत्ती हा कळपात राहणारा प्राणी आहे. तो सहसा कुणाशी पंगा घेत नाही अथवा कुणाला त्रास देत नाही. हत्तीने नुसता शक्तीनेच नाही तर बुद्धीने देखील तल्लख आहे.
Viral Video : हत्ती(Elephant ) हा प्राणी शरीराने अवाढव्य असला तरी तो अत्यंत निरागस आणि जंगलातील सर्वात समजूतदार प्राणी समजला जातो. अशाच एका मोठ्या हत्तीची छोटी गोष्ट इंटरनेटवर व्हायरल(Viral Video) झाली आहे. हा 45 सेकंदाचा व्हिडिओ एकदम कमाल आहे. यात हत्तीने स्वत:चा शॉक लागण्यापासून बचाव केला आहे.
जंगलातील सर्वात महबलाढ्य प्राणी अशी हत्तीची ओळख. म्हणूनच तर वाघही हत्तीच्या नादाला लागत नाही. हत्ती हा कळपात राहणारा प्राणी आहे. तो सहसा कुणाशी पंगा घेत नाही अथवा कुणाला त्रास देत नाही. हत्तीने नुसता शक्तीनेच नाही तर बुद्धीने देखील तल्लख आहे.
हत्तीच्या बुद्धीमतेची चुणक दाखवणारा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडिओ कुठला आहे हे समजू शकलेले नाही. @Geethanjali_IFS नावाच्या एका ट्र्रॅव्हरलने आपल्या ट्विटर हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत हत्तीने जे काही केले ते पाहून सगळ्यांनाच कमाल वाटत आहे.
जगंलातून बाहेर पडताना हत्तीला रस्त्यावर यायचे होते. पण, मध्येच तारांचे कुंपन आडवे येते. या तारांमुळे शॉक लागू शकतो अशी भिती या हत्तीला वाटली. यामुळेच हत्तीने हळूच पायने दोन तीन वेळा या तारांना स्पर्श करुन काही धोका तर नाही ना याची खात्री करुन घेतली. यानंतर हळूच हे तारांचे कुंपन त्याने तोडले. यानंतर त्याने या कुंपनावरुन लांब पाय टाकत हे कुंपन ओलांडले. कुंपन पार केल्यानंतर हत्ती रस्त्यावरुन निवांतपणे मार्गस्थ झाला.
ट्र्रॅव्हरलने हत्तीचे हे चातुर्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. @Geethanjali_IFS यांनी ट्विटवर शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेक रिेट्वीट येत आहेत. लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून यावर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.