Elon Musk imposes Twitter Rate Limit: ट्विटरवरील बॅकएंड बदलांमुळे लाखो वापरकर्ते अडचणाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आता ट्विटरचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी फतवा लागू केला आहे. डेटा स्क्रॅपिंग आणि सिस्टम मॅनिपुलेशन टाळण्यासाठी एलॉन मस्क यांनी नवी घोषणा केली आहे. त्यामुळे आता सर्वांच्याच अडचणीत वाढ झाली आहे. एका दिवसात किती पोस्ट कोण वाचतील यावर त्यांनी तात्पुरती मर्यादा (Twitter Rate Limit) लागू केल्याची माहिती एलॉन मस्क यांनी दिली आहे.


काय म्हणाले Elon Musk?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डेटा स्क्रॅपिंग आणि सिस्टम मॅनिप्युलेशनच्या पातळीचे निराकरण करण्यासाठी आम्ही तात्पुरत्या मर्यादा (Rate Limit Exceeded) लागू केल्या आहेत, असं एलॉन मस्क यांनी म्हटलं आहे. त्यावेळी वेरिफाईड अकाऊंटला दिवसाला 6000 पोस्ट वाचता येतील, तर अनवेरिफाईड अकाऊंटला 600 पोस्ट दिवसाला वाचता येतील. त्याचबरोबर नवीन अनवेरिफाईड अकाऊंटला दिवसाला फक्त 300 पोस्ट वाचता येणार आहे, अशी माहिती ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी दिली आहे.


पाहा ट्विट 



एलॉन मस्क यांच्याकडे ट्विटरची मालकी गेल्यापासून या मायक्रोब्लॉगिंग वेबसाईटमध्ये (Microblogging website) अनेक बदल झाले आहेत. अशातच आता नवा बदल करण्यात आल्याने अनेकांच्या मोबाईलवर पोस्ट दिसत नसल्याचं दिसतंय. अनेक मोठ्या कंपन्यांना देखील हा नियम लागू असल्याने आता सर्वांचीच चिंता वाढल्याचं दिसतंय. 


आणखी वाचा - विलीनीकरणानंतर HDFC बनली जगातली चौथी सर्वात मोठी बँक; भारतातील सर्वात मोठी आर्थिक घडामोड


दरम्यान, सकाळपासून दर मर्यादा (Rate Limit Exceeded) ओलांडल्याचं सांगत युजर्सना पोस्ट करण्यापासून रोखलं जात आहे. भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील सर्वत्र रेट लिमिट लागू केलं गेलंय. त्यामुळे ट्विट करण्यात तसेच इतरांचे ट्विटर अकाऊंटला फॉलो करण्यात अडचणी येत आहेत.