विलीनीकरणानंतर HDFC बनली जगातली चौथी सर्वात मोठी बँक; भारतातील सर्वात मोठी आर्थिक घडामोड

एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक यांचं विलीनिकरण लागू झाले आहे. विलीनीकरणानंतर HDFC जगातली चौथी सर्वात मोठी बँक बनलेय. 

Jul 01, 2023, 21:40 PM IST

HDFC and HDFC Bank Merger :  एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक यांचं विलीनिकरण 1 जुैलपासून लागू झाले आहे. विलीनीकरणानंतर जगातली चौथी सर्वात मोठी बँक म्हणून एचडीएफसी बँक ओळखली जाणार आहे. एचडीएफसीचे लाखो कर्मचारी आता एचडीएफसी बँकेचे कर्मचारी असणार आहेत. अर्थिक दृष्टीनं हे विलीनकरण भारतातील आतपर्यंतचे सर्वोत मोठे विलीनीकरण ठरले आहे. 

 

1/6

मार्च अखेरीला एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक यांचा एकत्रित एकूण महसूल 41 लाख कोटी रुपयांच्या घरात आहे.

2/6

मार्च 2023 अखेरीस दोन्ही कंपन्यांचा मिळून एकूण नफा 60 हजार कोटी रुपये नोंदवण्यात आला आहे.

3/6

 पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) ने 16 जुलै रोजी दोन्ही वित्तीय संस्थांच्या विलीनीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती.

4/6

एचडीएफसी बँक आणि तिची मूळ कंपनी हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (एचडीएफसी लि.) यांना एप्रिलमध्ये त्यांच्या संबंधित संचालक मंडळाकडून प्रस्तावित विलीनीकरणासाठी मंजुरी मिळाली होती.

5/6

SEBI ने HDFC लि.ची उपकंपनी असलेल्या HDFC प्रॉपर्टी व्हेंचर्स लिमिटेडच्या नियंत्रणात बदल करण्यास मान्यता दिली यांनतर हे विलीनीकरण झाले आहे. 

6/6

एचडीएफसीचे 25 समभाग असणाऱ्या समभागधारकांना एचडीएफसी बँकेचे 45 समभाग मिळणार आहेत.