Elon Musk New Rule : टेस्लाचे सीईओ एलोन मस्क (Tesla CEO Elon Musk) यांनी ट्विस्ट अॅण्ड टर्नसह ट्विटरचे अधिग्रहण केल्यानंतर काही मिनिटांतच ट्विटरच्या सर्वोच्च कार्यकारीला काढून टाकले. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि ट्विटरचे नवे बॉस एलॉन मस्क हे त्यांच्या वेगवान निर्णयांसाठी ओळखले जातात. अलीकडे ट्विटर विकत घेतल्यानंतर त्यांनी अनेक झटपट निर्णय घेतले आहेत. दरम्यान, ट्विटरच्या गोपनीय माहितीबाबत देखील मस्क (Elon Musk) जास्त गांभीर्याने विचार करत असून, यावरून त्यांनी थेट ट्विटरच्या कर्मचार्‍यांना धमकी दिली असून, अल्टिमेटम जारी केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगप्रसिद्ध शॉर्ट मेसेजिंग सोशल माध्यम ट्विटरची (Twitter) सूत्रे नुकतीच इलॉन मस्क यांनी आपल्या हाती घेतली आहेत. मस्क ट्विटरचे बॉस झाल्यानंतर त्यांनी कंपनीत अनेक मोठे बदल केले आहेत. दरम्यान, ट्विटरची गोपनीय माहिती लीक करण्याबद्दल मस्क अधिक सक्त झाले आहेत. कर्मचाऱ्यांनी कोणतीही माहिती प्रेसला देऊ नये अन्यथा कायदेशीर परिणाम भोगावे लागतील. अशी थेट धमकी मस्क यांनी दिली आहे. तसेच, याबाबत कर्मचाऱ्यांची प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी देखील घेतली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीची गोपनीय माहिती लीक करणे कंपनी हिताच्या विरुद्ध आणि नियमांचे उल्लंघन करणारे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


वाचा: ट्विटरवर नाव बदल्यावर Blue Tick'गायब', जाणून घ्या आजपासून कोणते होणार बदल?  


विशेषत: माध्यमांना काही माहिती पाठविल्यास त्याविरोधात योग्य कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, ट्विटरमध्ये कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढून टाकणे. तसेच राजीनामानाट्य मागील काही दिवासांपासून सुरू आहे. अशात मस्क यांच्या नव्या फतव्या मुळे ट्विटरचे कर्मचारी अजून त्रस्त झाले आहेत.