Shocking News : मस्करीची कुस्करी... अशी म्हण आहे. मात्र, या म्हणी प्रमाणे माजक मस्ती अंगाशी आली आहे. मित्राच्या पार्श्वभागात कॉम्प्रेसर  पाइपने हवा भरली आणि त्याला गंभीर दुखापत झाली. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) एका पेट्रोल पंपावर भयानक घटना (Shocking News)  घडली आहे. या प्रकरणी हे कृत्य करणाऱ्यांविरोधता पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे (Crime News) . 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. पेट्रोल पंपावर काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी त्यांच्या सहकारी कर्मचार्‍याच्या पार्श्वभागात एअर नोजल पंपाने हवा भरली. यात हा कर्मचारी गंभीर जखमी झाला.  गाझियाबादच्या सिहानी गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या एका पेट्रोल पंपावर हे सर्व कर्मचारी काम करत होते.


पेट्रोल पंपावर काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी त्यांच्या सहकारी कर्मचार्‍याची अश्लील चेष्टा केली.  पंपावरील सहकारी कर्मचाऱ्यांनी पेट्रोल पंपावरील एअर नोझलने सहकारी कर्मचाऱ्यांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये हवा भरली. त्यामुळे त्याची प्रकृती खालावली. कंप्रेसर पाइपने  पार्श्वभागात हवा भरल्याने त्याच्या आतील अवयवांना इजा पोहचल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पीडित व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टर म्हणाले. 


मजाक करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला


पार्श्वभागात एअर कंप्रेसर पाइपने हवा भरल्याने या कर्मचाऱ्याला गंभीर दुखापत झाली. त्याला दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे या कर्मचाऱ्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. चेष्टा करत असताना सहकाऱ्याची प्रकृती बिघडल्याने पाहून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.


कुटुंबियांची पोलिसांकडे तक्रार


या घटनेचे वृत्त समजताच पीडित तरुणाच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला.  पीडित तरुणाच्या भावाने या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे. अशा प्रकारची मजा मस्ती कशी काय केली जाऊ शकते ज्यामुळे एखाद्याचा जीव धोक्यात येवू शकतो. पीडित तरुणाच्या भावाने या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची त्यांनी चौकशी केली. तसेच पेट्रोल पंपावरील CCTV फुटेज तपासले.


यामध्ये तीन चार जण पीडीत व्यक्तीच्या पार्श्वभागात कॉम्प्रेसर हवा भरताना दिसत आहे. तसेच ते या तरुणाची खिल्ली उडवत आहेत. तो त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, ते ऐकालयला तयार नाहीत ते त्याची अवस्थापाहून त्याच्यावर हसत असल्याचेही व्हिडिओत दिसत आहे.   CCTV फुटेजच्या आधारे पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.