मासिकपाळीदरम्यान महिलांच्या सुट्टीबाबत कायदा व्हावा: वृंदा करात
नोकरी करणाऱ्या महिलांना मासिक पाळीदरम्यान सुट्टी मिळावी यासाठी कायदा होण्याची आवश्यकता आह, असे मत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा करात यांनी व्यक्त केले आहे.
हैदराबाद : नोकरी करणाऱ्या महिलांना मासिक पाळीदरम्यान सुट्टी मिळावी यासाठी कायदा होण्याची आवश्यकता आह, असे मत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा करात यांनी व्यक्त केले आहे.
मासिक पाळीदरम्यान महिलांना सुट्टी मिळावी त्यासाठी समाजातील विविध स्तरातून होणाऱ्या मागणीला आपला पाठींबा असल्याचेही करात यांनी म्हटले आहे. या कालावधीत सुट्टी मिळण्याची सुवीधा मिळावी तसेच, ही सुट्टी घ्यायची किंवा नाही याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार संबंधीत स्त्रिला असला पाहिजे, असेही मत करात यांनी व्यक्त केले आहे. त्या एका कार्यक्रमादरम्यान बोलत होत्या.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मुंबईतील "कल्चर मशिन" नावाच्या एका खासगी कंपनीने मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी महिलांना सुट्टी देण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर ही मागणी वाढू लागली आहे.