जम्मू काश्मिरात चकमक, दोन दहशतवाद्यांचा खात्मा
जम्मू काश्मीरच्या बांदीपोरा भागात ऑपरेशन ऑलआऊट अंतर्गत धुमश्चक्री सुरु आहे. भारतीय सीमेत घुसखोरी करणारे दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये चकमक सुरु आहे. या चकमकीत दोन दशहतवादी ठार करण्यात आलेत. तर तीन जवान जखमी झालेत.
श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या बांदीपोरा भागात ऑपरेशन ऑलआऊट अंतर्गत धुमश्चक्री सुरु आहे. भारतीय सीमेत घुसखोरी करणारे दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये चकमक सुरु आहे. या चकमकीत दोन दशहतवादी ठार करण्यात आलेत. तर तीन जवान जखमी झालेत.
जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये सुरक्षापथके आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे, सकाळी पावणे पाच वाजल्यापासून चकमक सुरु आहे. बांदीपोरा इथल्या हाजीन भागात ही चकमक सुरु असल्याची माहिती मिळतेय. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलंय.
हाजीन परिसर लष्करानं घेरला असून दोन ते तीन दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे. या चकमकीत तीन जवान जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. सीमेपलिकडून सातत्याने दहशतवादी भारतात घुसत आहेत. दोन आठवड्यापूर्वीही दहशतवादी हल्ला झाला होता. लष्कराच्या कम्पवर हा हल्ला घडवून आणला होता. तसेच श्रीनगर विमानतळ उडविण्याचा दहशतवाद्यांचा कट होता, अशी माहिती पुढे आली होती.