Girlfriend आणि Boyfriend चा अर्ध्या तासाच्या अंतराने मृत्यू; तिचा अपघाती मृत्यू तर त्याने...
After Girlfriend Death In Bike Accident Boy Did Shocking Thing: हा सारा प्रकार दुपारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडला. तरुणीने अपघातात जीव गमावला तर तरुणाने आत्महत्या केली.
Girlfriend Death In Bike Accident Boy Did Shocking Thing: चेन्नईमधील इस्ट कोस्ट रोडवर शनिवारी रात्री झालेल्या एका विचित्र घटनेमध्ये दोन 20 वर्षीय व्यक्तींनी प्राण गमावले. इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी असलेल्या 20 वर्षीय तरुणीचा दुचाकीच्या अपघातामध्ये मृत्यू झाला. या तरुणीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने तिच्या प्रियकरानेही टोकाचं पाऊल उचलत तिच्या मृत्यूनंतर अर्ध्या तासामध्ये बससमोर उडी घेऊन आत्महत्या केली.
नेमकं या दोघांबरोबर घडलं काय?
हे दोघेही दुचाकीवरुन त्यांच्या कॉलेजला जात असताना त्यांच्या दुचाकीला अपघात झाल्याचं 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्ता म्हटलं आहे. ममलापूरमवरुन हे दोघे दुचाकीने पदलमच्या दिशेने येत होते. त्यावेळी दुपारी साडेबाराच्या सुमारास पुडुचेरी रस्ते रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या बसचा मागील भाग या दोघांच्या दुचाकीला घासून गेला. हा अपघात मामालापूरमजवळ घडला. बसचा धक्का लागल्याने दुचाकीवर मागील बाजूस बसलेली तरुणी थेट बसच्या चाकाखाली आली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.
मृत्यू झाल्यानंतरही तो तिला रुग्णालयात घेऊन गेला
या अपघातातून वाचलेल्या तिच्या प्रियकराने कसंबसं स्वत:ला सावरलं आणि तिला वाचवू शकू असं वाटल्याने तो तिला रक्तबंबाळ अवस्थेत जवळच्या रुग्णालयात दाखल करायला घेऊन गेला. जखमी झाल्याने तिची शुद्ध हरपली आहे असं त्याला वाटतं होतं. मात्र डॉक्टरांनी तिचा अपघात झाला तेव्हाच मृत्यू झाल्याचं या तरुणाला सांगितलं.
प्रेयसीच्या मृत्यीनंतर त्याने उचललं टोकाचं पाऊल
आपल्यामुळे आपल्या प्रेयसीचा मृत्यू झाला या भावनेतून हा तरुण पुन्हा त्याच रस्त्यावर गेला आणि त्याने धावत्या बससमोर उडी घेतली. गंभीर जखमी झालेल्या या तरुणाचा रुग्णालयामध्ये दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. प्रेयसीच्या मृत्यूनंतर अर्ध्या तासाच्या अंतराने त्यानेही प्राण सोडले.
पोलीस काय म्हणाले?
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेयसीला गमावल्याचं दु:ख त्याला झेपलं नाही. त्यामुळेच त्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे. नंतर चौकशीमध्ये हा मुलगा या तरुणीच्या कॉलेजमध्येच तिसऱ्या वर्षाला शिकत होता असं समोर आलं आहे.