VPF limit: तुम्हीसुद्धा वॉलिंटियर प्रॉविडंट फंड(VPF) अंतर्गत गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. यासंदर्भात सरकारकडून मोठे प्लानिग केले जात आहे. इकोनॉमिक्स टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार कर्मचारी भविष्य निधी संघटनेकडून वॉलिंटियर प्रॉविडंट फंडमध्ये टॅक्स फ्री व्याजासोबतच गुंतवणूकीची मर्यादा अडीच लाखापर्यंत वाढवली जाऊ शकते. या निर्णयमामुळे मोठ्या गुंतवणुकीवर मिळणारे व्याज टॅक्स मुक्त होणार आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडून यासंदर्भात चाचपणी सुरु असल्याची माहिती या प्रकरणाशी संबंधीत सुत्रांनी दिली आहे. 


पुढच्या वर्षात अर्थ मंत्रालयाकडून पाऊल उचलले जाण्याची शक्यता 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2025-2026 च्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून यांदर्भातील निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. जे कर्मचारी मध्यम वर्गात येतात आणि ज्यांचा पगार कमी आहे, अशा कर्मचाऱ्यांना या निर्णयामुळे मोठा फायदा होणार आहे. लोकांनी ईपीएफमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करावी, जेणेकरुन निवृत्तीनंतर त्यांच्याकडे पुरेसे पैसे असतील. आधी सरकारने ईपीएफध्ये जमा केल्या जाणाऱ्या गुंतवणूकीवर अडीच लाखापर्यंतची गुंतवणूक टॅक्स फ्री केले होते. यावर अधिक मिळणाऱ्या व्याजावर टॅक्स द्यावा लागतो. 


व्हीपीएफमध्ये गुंतवणुकीने टॅक्सवर फायदा 


जास्तीस्त जास्त पैसा गोळा झाल्यावर टॅक्स लावला जाऊ शकेल, यासाठी सरकारकडून हा निर्णय घेतला गेलाय. ज्यांचा पगार जास्त आहे आणि जे ईपीएफमध्ये जास्त पैसे जमा करतात, त्यांना टॅक्स कमी लागावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. याप्रकारे व्हीपीएफमध्ये जमा केलेली रक्कम, यावर मिळणारे व्याज आणि काढली जाणारी रक्कम या सर्वावर कोणत्याही प्रकारचा टॅक्स द्यावा लागणार नाही.व्हीपीएफ गुंतवणुकीमुळे तुम्हाल टॅक्सच्या व्यवहारात फायदाच फायदा होणार आहे. 


जेव्हा पीएफच्या पैशांवर मिळायचे 12 टक्के व्याज 


ईपीएफओकडून मागच्या अनेक आर्थिक वर्षांपर्यंत 8 टक्क्यांहून अधिक व्याज दिले जात आहे. 1990 या आर्थिक वर्षामध्ये हे 12 टक्के इतर सर्वोच्च पातळीवर पोहोचले. आर्थिक वर्ष 2000 पर्यंत हे सलग 11 वर्षापर्यंत त्याच पातळीवर राहिले. आर्थिक वर्ष 2022 साठी ईपीएफओ व्याज दर 8.10 टक्के इतके होते. यानंतर 2023 मध्ये हे 8.15 टक्के आणि आर्थिक वर्षे 2024 साठी हे 8.24 टक्के इतके होते. 


ईपीएफओमध्ये 20 लाख कोटीहून अधिक रक्कम जमा 


ईपीएफमध्ये सध्याच्या नियमानुसार तुमची तुमच्या इच्छेनुसार पैसे जमा करु शकता. यावर कोणती मर्यादा नाही. पण सरकारने या नियमाचा गैरवापर होऊ नये यासाठी नियम आणले आहेत. आता तुम्ही अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करत असाल तर तुम्हाला टॅक्स द्यावा लागतो. ज्यांचा जास्त पगार आहे आणि जे टॅक्स वाचवण्यासाठी ईपीएफओमध्ये गुंतवणूक करतात, अशांसाठी हा नियम बनवला होता. ईपीएफमध्ये करोडो कर्मचारी पैसे गुंतवतात आणि करोडो कर्मचारी पेन्शन घेत आहेत. ईपीएफओमध्ये साधारण 20 लाख कोटीहून अधिक रक्कम जमा आहे.