EPFO: ईपीएफओ सब्सक्राईबर्ससाठी एक महत्वाची बातमी नुकतीच समोर आली आहे. पीएफ खातेदार आता घरबसल्याच आपल्या खात्याची माहिती मिळवू शकतात. या 4 पद्धतींचा वापर करुन पीएफमध्ये असलेल्या बॅलेंसची माहिती मिळवता येते. कोणत्या 4 पद्धती आहेत या ज्यांचा वापर करुन पीएफ बॅलेंसची माहिती मिळू शकते, ते जाणून घेऊया...


कोणत्या नंबरद्वारे बॅलेंसची माहिती मिळवावी?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीएफ अकाउंट होल्डरने जो नंबर रजिस्टर केलेला असेल त्या नंबरद्वारे 011-22901406 या नंबरला मिस्ड कॉल करावा. मिस्ड कॉल केल्यानंतर काही वेळेतच रजिस्टर मोबाईलनंबरला एसएमएसमार्फत पीएफ बॅलेंसची माहिती मिळेल.


SMS द्वारे मिळवा माहिती


रजिस्टर मोबाईल नंबरद्वारे कॉल शिवाय पीएफ अकाउंट होल्डर SMS द्वारे देखील पीएफ बॅलेंसची माहिती मिळवता येते.


'या' सोप्प्या पद्धतीने मिळवा पीएफ बॅलेंसची माहिती


- रजिस्टर मोबाईल नंबरद्वारे 7738299899 नंबरवर एसएमएस करा.
- EPFO UAN LAN टाईप करा. (या ठिकाणी LAN म्हणजे भाषा असा अर्थ होतो.)
- जर तुम्हाला पीएफबद्दलची माहिती इंग्रजी भाषेत पाहिजे असेल तर LAN ऐवजी ENG असं लिहावं आणि हिच माहिती हिंदी भाषेत पाहिजे असेल तर LAN ऐवजी HIN असं टाईप करा.


वेबसाईटद्वारे माहिती


EPF च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन देखील पीएफबद्दलची माहिती मिळवता येते.


अशी देखील पीएफ अकाउंटबद्दलची माहिती मिळवू शकता...


- EPF पासबुक पोर्टल open करा.
- पोर्टलवर UAN आणि Password टाईप करुन लॉग इन करा.
- यानंतर Download/View Passbook हा पर्याय निवडा
- आता तुमच्या स्क्रीनवर पासबुक दिसेल आणि पीएफ बॅलेंसची माहिती तु्म्ही पाहू शकता


पीएफ अकाउंटची माहिती मिळवा या सोप्प्या पद्धतीने...


- सर्वात प्रथम, मोबाईलमध्ये अ‍ॅप डाऊनलोड करा
- अ‍ॅप इनस्टॉल झाल्यानंतर EPFO हा पर्याय निवडा
- यामध्ये Employee Centric Services यावर क्लिक करा
- यानंतर View Passbook वर क्लिक करुन तुमचा UAN आणि पासवर्ड टाईप करा
- रजिस्टर मोबाईल नंबरवर OTP येईल.
- मिळालेला ओटीपी टाईप केल्यानंतर तुम्हाला पीएफ बॅलेंसची माहिती मिळेल.