तुम्ही नोकरदार असाल तर केंद्र सरकार देणार 7 लाखांचा फायदा; आजच भरा फॉर्म
EPFO कडून 7 लाख रुपयांचा लाभ खातेदारांना दिला जात आहे. जर तुम्ही देखील EPFO चे सदस्य असाल तर तुम्हाला याचा फायदा कसा घेता येईल ते वाचा.
नवी दिल्ली: तुम्हीही नोकरी करत असाल तर तुम्हाला 7 लाख रुपयांचा बंपर लाभ मिळण्याची संधी आहे.EPFO कडून नोकरदारांना अनेक प्रकारच्या सुविधा पुरवल्या जातात. या अंतर्गत आता EPFO तुम्हाला संपूर्ण 7 लाख रुपयांचा लाभ देत आहे.
जर तुम्ही EPFO चे सदस्य असाल तर तुम्ही याचा फायदा सहज घेऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त एक फॉर्म भरावा लागेल, त्यानंतरच त्याचा लाभ घेता येईल. चला संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊया
पेन्शन व्यतिरिक्त जीवन विम्याचाही लाभ
पीएफ आणि पेन्शन व्यतिरिक्त, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या सदस्यांना जीवन विम्याचा लाभ देखील देते, ज्या अंतर्गत तुम्हाला 7 लाख रुपयांचा लाभ मिळतो. विशेष म्हणजे ही सुविधा ग्राहकांना मोफत उपलब्ध आहे. यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही.
ईपीएफओचे ट्विट
EPFO आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.
EPFO ने ट्विटमध्ये लिहिले आहे की EPF चे सर्व सदस्य कर्मचारी डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम, 1976 (EDLI) अंतर्गत समाविष्ट आहेत.
EDLI योजने अंतर्गत, दर EPF खात्यावर 7 लाख रुपयांपर्यंतचे मोफत विमा संरक्षण उपलब्ध आहे.
सदस्याचा कोणत्याही नामांकनाशिवाय मृत्यू झाल्यास, दाव्यावर प्रक्रिया करणे कठीण तसेच अडचणीचे ठरते. जाणून घ्या ऑनलाईन माध्यमातून नॉमिनेशन डिटेल्स कसे भरू शकतात ते...
EDLI अंतर्गत फायदे
EPF च्या सर्व सदस्यांना कर्मचारी ठेव लिंक्ड इन्शुरन्स स्कीम, 1976 (EDLI) अंतर्गत सर्व EPF खात्यांवर मोफत विमा म्हणून पूर्ण 7 लाख रुपयांचा लाभ दिला जातो.
ई-नॉमिनेशन प्रक्रिया
1. तुम्हाला प्रथम EPFO च्या अधिकृत वेबसाइट https://www.epfindia.gov.in/ वर जावे लागेल.
2. येथे तुम्हाला 'Services' पर्यायावर क्लिक करावे लागेल.
3. यानंतर तुम्हाला येथे 'For Employees' वर क्लिक करावे लागेल.
4. आता 'सदस्य UAN/ऑनलाइन सेवा (OCS/OTCP)' वर क्लिक करा.
5. आता UAN आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.
6. यानंतर 'मॅनेज' टॅबमध्ये 'ई-नामांकन' निवडा.
7. यानंतर स्क्रीनवर 'Provide Details' टॅब दिसेल, 'Save' वर क्लिक करा.
8. कुटुंब घोषणा अपडेट करण्यासाठी 'yes' वर क्लिक करा.
9. आता 'कौटुंबिक तपशील जोडा' वर क्लिक करा. एकापेक्षा जास्त नॉमिनी देखील जोडले जाऊ शकतात.
10. कोणत्या नॉमिनीच्या शेअरमध्ये किती रक्कम येईल हे जाहीर करण्यासाठी 'नामांकन तपशील' वर क्लिक करा. तपशील टाकल्यानंतर 'सेव्ह' करा
11. 'EPF नामांकन' वर क्लिक करा.
13. OTP जनरेट करण्यासाठी 'ई-साइन' वर क्लिक करा. आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर OTP पाठवला जाईल.
14. निर्दिष्ट जागेत OTP प्रविष्ट करा आणि सबमिट वर क्लिक करा.