मुंबत : जर तुम्ही पीएफ खातेधारक असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. वास्तविक, कर्मचारी भविष्य निधीने आपल्या सर्व ग्राहकांना अलर्ट जारी केला आहे. ईपीएफओने आपल्या 6 कोटी पीएफ खातेधारकांना वैयक्तिक माहिती आणि कोणत्याही प्रकारचे अ‍ॅप डाउनलोड करण्याबाबत सतर्क केले आहे. ईपीएफओने आपल्या ट्विटर हँडलवर ही माहिती दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणत्याही नोकरदार व्यक्तीसाठी, त्याच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम अर्थात पीएफ सर्वात महत्वाची गोष्ट आहे. ही रक्कम भविष्यातील सुरक्षिततेसाठी सर्वात महत्वाचा निधी आहे. यामध्ये तुमच्या पगारातील काही भाग जमा केला जातो, आणि त्या अकाउंटवर तुम्हाला व्याज देखील मिळते. अशा परिस्थितीत, तुम्ही तुमच्या पीएफ पैशांबाबत खूप सतर्क असणे आवश्यक आहे.


 परंतु आता काही भामटे तुमच्या त्या अकाउंटमधून पैसे काढू पाहत आहेत. त्यात आता लोकं डिजीटायजेशनकडे वळल्यामुळे हॉकर्स त्याचा फायदा उचलतात आणि तुमचे पैसे लूटण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब करतात. त्यामुळे EPFO खातेधारकांना सतर्क करत आहेत.


EPFO ने काय सांगितले ते जाणून घ्या


EPFO ने आपल्या खातेधारकांना कोणत्याही बनावट कॉल्सपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. ईपीएफओने अलर्टमध्ये म्हटले आहे की, "ईपीएफओ कधीही फोन कॉलवर आपल्या खातेधारकांकडून यूएएन नंबर, आधार क्रमांक, पॅन नंबर किंवा बँक तपशील विचारत नाही किंवा ईपीएफओ त्याच्या खातेधारकांना कोणताही फोन कॉल करत नाही." त्यामुळे तुम्हाला जर असा कोणाचा कॉल आला तर सतर्क व्हा.


ईपीएफओच्या नावाने येणाऱ्या फोन कॉल्सपासून नेहमी सतर्क रहा. यासोबतच ईपीएफओने बनावट वेबसाईट टाळण्याचा सल्लाही दिला आहे. जर तुम्ही EPFO ​च्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले, तर तुम्हाला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल आणि तुमची फसवणूक होऊ शकते.



बँका वेळोवेळी अलर्ट देखील जारी करतात


बँक देखील आपल्या ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी दररोज अलर्ट जारी करते. बँक आपल्या ट्विटर हँडल आणि एमएमएसद्वारे ग्राहकांना अलर्ट पाठवत राहते.


लॉकडाऊन दरम्यान बँकिंग फसवणुकीच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे. RBI च्या अहवालानुसार डिजिटल व्यवहारांमुळे 2018-19 मध्ये 71,543 कोटी रुपयांची बँकिंग फसवणूक झाली आहे. या काळात बँक फसवणुकीची 6800 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली. गेल्या 11 आर्थिक वर्षांमध्ये बँक फसवणुकीची एकूण 53 हजार 334 प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर त्यांच्या माध्यमातून 2.05 लाख कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे.