मुंबई : देशभरात इलेक्ट्रिक वाहनांचा बोलबाला वाढला आहे. पर्यावरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने तसेच, महाग होत जाणाऱ्या इंधनामुळे आता लोकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढत आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या स्टॉक्समध्येदेखील ऍक्शन दिसून येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दमदार परताव्याची शक्यता
इलेक्ट्रिक वाहने बनवणाऱ्या संपूर्ण इंडस्ट्रीला फोकस केल्यास त्या स्टॉक्समध्ये खरेदी करता येईल ज्या कंपन्या लिथियम बॅटरी, चार्जिंग स्टेशन किंवा त्यासंबधी पार्ट्स किंवा इतर प्रोडक्ट बनवतात. या स्टॉक्समध्ये गुंतवणूक केल्यास  येत्या काळात चांगला परतावा मिळू शकतो.


GG Engineering
इलेक्ट्रिक कारच्या इंडस्ट्रीमध्ये Tata Motors, Ashok leyland आणि Exide Industries चे नाव लोकप्रिय आहे. परंतु BSE लिस्टेड कंपनी GG  Engineering देखील या क्षेत्रात दमदार व्यवसाय करीत आहे.


Exide Industries देशातील सर्वात मोठी बॅटरी मॅन्युफॅक्चरर्स कंपनी आहे. याशिवाय टाटा मोटार्स आणि Jaguar Land Rover  आपल्या गाड्यांना इलेक्ट्रिफाई करण्यावर विचार करीत आहे.देशात सध्या  Tata Tigor EV आणि Nexon EV इंडस्ट्रीचे लिडिंग मॉडेल आहेत. वर्ष 2020 मध्ये कंपनीने 2600 इलेक्ट्रिक वाहनं विकली. 


GG Engineering ने देशातील पहिले ऑटोमेटेड आणि स्मार्ट RVMs लॉंच केले आहे. कंपनीला वेस्टर्न रेल्वेमार्फत RVMs इंस्टॉल करण्याची ऑर्डर मिळाली होती.याशिवाय महाराष्ट्र सरकारच्या ईव्ही पॉलिसीचा देखील फायदा कंपनीला मिळेल.


महाराष्ट्र सरकारने आपल्या इलेक्ट्रिक वाहने धोरणाअंतर्गत 930 कोटी रुपये ईव्ही इकोसिस्टिमच्याला प्रेरणा देण्यासाठी आणि विकासासाठी जारी केले आहेत.  महाराष्ट्र सरकार इलेक्ट्रिक वाहनांच्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांच्या हिताच्या बाजून आहे.