तुमच्या बँक खात्यात पैसे नसले तरी तुम्हाला 10 हजार रुपये मिळतील; पाहा कसे ते?
Bank Account News : तुमच्याकडे बँकेच पासबुक (Bank Passbook) आहे. परंतु त्यात पैसे नसले तरीही तुम्हाला 10 हजार रुपये मिळू शकतात. मात्र यासाठी तुमच्याकडे....
मुंबई : Bank Account News : तुमच्याकडे बँकेच पासबुक (Bank Passbook) आहे. परंतु त्यात पैसे नसले तरीही तुम्हाला 10 हजार रुपये मिळू शकतात. मात्र यासाठी तुमच्याकडे जन धन खाते असणे आवश्यक आहे. जर तुम्ही प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Jan Dhan Yojana) खाते उघडले नसेल तर ते आताच उघडा. जन धन योजनेंतर्गत बँक खाती शून्य शिल्लकीवर उघडली जातात.(Zero Balance Account) केंद्र सरकारच्या या योजनेला सात वर्षे पूर्ण झाली असून आतापर्यंत 41 कोटींहून अधिक खाती उघडण्यात आली आहेत. या योजनेत विम्यासह अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. यातील एक सुविधा म्हणजे ओव्हरड्राफ्ट. त्याबद्दल अधिक जाणून घ्या.
10 हजार रुपये असे मिळतील
जन धन योजनेअंतर्गत, तुमच्या खात्यात शिल्लक काहीही नसेल तरीही, तुम्हाला 10,000 रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळेल. ही सुविधा अल्प मुदतीच्या कर्जासारखी आहे. पूर्वी ही रक्कम 5 हजार रुपये होती. सरकारने ती आता 10 हजारांपर्यंत वाढवली आहे. या खात्यातील ओव्हरड्राफ्ट सुविधेसाठी कमाल वयोमर्यादा 65 वर्षे आहे. ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमचे जन धन खाते किमान 6 महिने जुने असावे. नसल्यास, फक्त 2,000 रुपयांपर्यंतचा ओव्हरड्राफ्ट उपलब्ध आहे.
योजना 2014 मध्ये सुरू झाली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात जन धन योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. ही योजना यावर्षी 28 ऑगस्ट रोजी सुरू झाली. या योजनेअंतर्गत 6 जानेवारी 2021 पर्यंत एकूण जन धन खात्यांची संख्या 41.6 कोटी झाली आहे. सरकारने या योजनेची दुसरी आवृत्ती 2018 मध्ये अधिक वैशिष्ट्ये आणि फायद्यांसह लॉन्च केली.
जन धन योजनेत अनेक सुविधा उपलब्ध आहेत
- जन धन योजनेअंतर्गत 10 वर्षांखालील मुलाचे खातेही उघडता येते.
- या योजनेअंतर्गत खाते उघडल्यावर तुम्हाला रुपे एटीएम कार्ड, 2 लाख रुपयांचे अपघात विमा संरक्षण, 30 हजार रुपयांचे जीवन संरक्षण आणि ठेव रकमेवर व्याज मिळते.
- यावर तुम्हाला 10 हजारांच्या ओव्हरड्राफ्टची सुविधाही मिळते.
हे खाते कोणत्याही बँकेत उघडता येते.
- यामध्ये तुम्हाला किमान शिल्लक राखण्याची गरज नाही