माजी पंतप्रधान वाजपेयींच्या सन्मानार्थ संसदेत तैलचित्र
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या तैलचित्राचं अनावरण करण्यात आलं.
नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ संसदेत त्यांचं तैलचित्र लावण्यात आलं हे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या तैलचित्राचं अनावरण करण्यात आलं. यावेळी उपराष्ट्रपती वेंकैया नायडू, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, विरोधी पक्षांचे नेते आणि संसदेचे सदस्य उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी वाजपेयींच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी म्हटलं की, वाजपेयी यांच्या सारखे व्यक्तित्व खूप कमी असतात. विरोधकांना देखील ते सहज सांभाळून घेत होते. वायपेयीजी आमच्यासाठी नेहमी प्रेरणास्त्रोत असतील असं देखील मोदींनी म्हटलं.
संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये माजी पंतप्रधान पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांचं तैलचित्र देखील आहे. आता वाजपेयींचं तैलचित्र देखील लावण्यात आलं आहे. यादरम्य़ान संसदेच्या सेंट्रल हॉलला सजवण्यात आलं होतं. माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचं हे तैलचित्र वृंदावनचे चित्रकार कृष्ण कन्हाई यांनी तयार केलं आहे.
संसदेत एक पोर्ट्रेट कमिटी असते जी संसदेत कोणत्याही नेत्याचं किंवा महापुरुषाचा फोटो लावण्याचा निर्णय घेते. लोकसभा अध्यक्ष या कमिटीच्या अध्यक्षा असतात. विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षाचे खासदार देखीय या कमिटीमध्ये असतात. या कमेटीने 18 डिसेंबर 2018 ला वाजपेयींची तैलचित्र लावण्याचा निर्णय घेतला होता.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा 16 ऑगस्ट 2018 ला निधन झालं होतं. वाजपेयी यांनी 3 वेळा पंतप्रधानपद भूषवलं. पहिल्यादा ते फक्त 13 दिवसांसाठी पंतप्रधान झाले होते. यानंतर 1998 मध्ये 13 महिने आणि 1999 मध्ये ते 5 वर्ष पंतप्रधान होते.