कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे शिक्षण मंत्रालयाने मे मध्ये होणाऱ्या सर्व ऑफलाइन परीक्षा पुढे ढकलल्या
कोविड -19 च्या दुसर्या लाटेमुळे शिक्षण मंत्रालयाने मे मध्ये नियोजित सर्व ऑफलाइन परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली आहे.
मुंबई : कोविड -19 च्या दुसर्या लाटेमुळे शिक्षण मंत्रालयाने मे मध्ये नियोजित सर्व ऑफलाइन परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली आहे. यामध्ये फक्त ऑफलाइन परीक्षा पुढे ढकल्या जातील परंतु, ऑनलाइन परीक्षा या त्यांच्या वेळापत्रकानुसार सुरू ठेवले जाऊ शकतात.
कोरोनामुळे बोर्डाच्या परीक्षा जवळपास सर्व राज्यात रद्द केल्या आहेत. गेल्या 24 तासात कोरोनाचे तीन लाख 68 हजार नवीन रुग्ण आढळले. तसेच 3 हजार 417 लोकांचा मृत्यू झाला आहे. या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेऊन शिक्षण मंत्रालयाने मे मध्ये होणाऱ्या सर्वच ऑफलाइन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
राजस्थानात CTET परीक्षा पुढे ढकलली
राजस्थान CTET 2021 परीक्षेचे आयोजन करणाऱ्या बीकानेर (राजस्थान) येथील शासकीय डूंगर कॉलेजने ही परीक्षा पुढे ढकलली आहे. अशा परिस्थितीत, या परीक्षेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थांना आता प्रतीक्षा करावी लागणार आहे.
JEE मेन्सची परीक्षा पुढे ढकलली जाऊ शकते
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर अनेक राष्ट्रीय परीक्षा, स्पर्धा परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत, संयुक्त प्रवेश परीक्षेची (JEE ) प्रगत 2021 परीक्षेची तारीखदेखील थोडी पुढे वाढविली जाऊ शकते असा अंदाज आहे. महामारी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून हा निर्णय घेण्यात येईल. परंतु अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
NEET परीक्षा पुढे ढकलली जाऊ शकते
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. PMO ने सांगितले की, MBBSच्या फायनल इयरच्या विद्यार्थींना माईल्ड कोविड रुग्णांच्या टेली कंसल्टेशन आणि मॉनिटरिंगचे काम दिले जाईल. असेही म्हटले जात आहे की, NEET वैद्यकीय प्रवेश परीक्षाही पुढे ढकलली जाऊ शकते. परंतु अजूनही याची अधिकृत घोषणा सरकारकडून झालेली नाही.