Independence Day 2022 : आज 15 ऑगस्ट 2022 रोजी भारत देश स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव साजरा करत आहे. देशाच्या  स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यापासून ते देशाच्या विविध भागात तिरंगा फडकवला जाणार आहे. लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवव्यांदा देशाला संबोधित करणार आहेत. यावेळी 21 तोफांची सलामीही देण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लाल किल्ल्यावरही कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. लाल किल्ल्याच्या परिसरात बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर राजधानी दिल्लीतही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.


व्हीव्हीआयपींच्या ताफ्यासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांच्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग निश्चित करण्यात आला आहे. याशिवाय आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. कार्यक्रमाला येणारी गर्दी हाताळण्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. 


कोरोना लक्षात घेता, प्रोटोकॉल देखील पाळले जाणार आहेत. लाल किल्ल्याभोवती पाच किलोमीटरच्या परिघात हवाई पाळत ठेवली जाईल. हा परिसर नो-काईट फ्लाइंग झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. बॅग, बॉक्स, कॅमेरे, कारच्या चाव्या आणि इतर अशा वस्तूंना परवानगी दिली जाणार नाही. कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत लोकांना लाल किल्ल्याकडे जाऊ दिले जाणार नाही. या विशेष सूचना सर्व झोनल अधिकारी/क्षेत्र अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.


गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 7:06 वाजता पंतप्रधान मोदी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधी राजघाटावर पुष्प अर्पण करतील. यानंतर 7.14 वाजता ते राजघाट येथून लाल किल्ल्याकडे रवाना होतील. 7:18 वाजता, RM, RRM आणि संरक्षण सुरक्षा लाहोरी गेट येथे पंतप्रधानांना घेण्यासाठी जातील. 7:20 वाजता लाल किल्ल्यावर गार्ड ऑफ ऑनर असेल. 7:30 वाजता पंतप्रधान लाल किल्ल्याच्या तटबंदीवर देशाचा तिरंगा फडकवतील आणि त्यानंतर देशाला संबोधित करतील. यानंतर संबंधित राज्यांच्या राजधानी, जिल्हा मुख्यालये, उपविभाग, गट, ग्रामपंचायती आणि गावांमध्ये राष्ट्रध्वज फडकावण्याचा सोहळा सकाळी 9.30 नंतर सुरू होईल.


ध्वजारोहणापूर्वी पंतप्रधानांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात येणार आहे. ज्या टीममध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आणि दिल्ली पोलिसांचे प्रत्येकी एक अधिकारी आणि प्रत्येकी 20 जवान असतील. गार्ड ऑफ ऑनरचे नेतृत्व विंग कमांडर कुणाल खन्ना करणार आहेत. पंतप्रधानांच्या गार्डमधील हवाई दलाच्या तुकडीचे नेतृत्व स्क्वॉड्रन लीडर लोकेंद्र सिंग, लष्कराच्या तुकडीचे नेतृत्व मेजर विकास सांगवान आणि नौदलाच्या तुकडीचे नेतृत्व लेफ्टनंट कमांडर अविनाश कुमार करतील. दिल्ली पोलीस दलाचे नेतृत्व अतिरिक्त डीसीपी (पूर्व दिल्ली) अचिन गर्ग यांच्याकडे असेल.