मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची Zee News वर लाईव्ह मुलाखत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झी न्यूजचे संपादक सुधीर चौधरी यांनी घेतली ही मुलाखत. मोदींनी मुलाखतीच्या सुरूवातीला प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. देशातील नागरिकांचे स्वप्न पूर्ण होतात आणि त्याचबरोबर देशाचे स्वप्न देखील पूर्ण होतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यूहरचना ते राजकारणापर्यंतच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर पंतप्रधान मोदींनी दिली. 


प्रश्न : कोणतं लक्ष घेऊन तुम्ही दावोसला जात आहात? 


 


पंतप्रधान मोदी : मोदींनी सांगितले की, सगळ्यांनाच माहित आहे की, दावोस ही एक प्रकारची अर्थ जगतातली सर्वा मोठी पंचायत आहे. अर्थ जगतातील मोठी मंडळी तेथे एकत्र येतात. भावी आर्थिक स्थिती नेमकं काय असणार आहे याकडे साऱ्यांचे लक्ष असते. तसेच स्वतः अर्थ जगतातील मंडळी तसेच  पॉलिसीमेकर्स तेथे उपस्थित असतात. 


जेव्हापासून पंतप्रधान मोदी बनलो आहे तेव्हापासून माझ्या मनात होतं की मला तेथे जायच होतं. यावेळी एशियान मीटिंग होत आहे. 10 मुख्य मंडळींची मिटींग येथे होत आहे. भारत आता आकर्षणाचं केंद्र होत आहे. त्यामुळे सर्वाचं लक्ष भारताकडे लागून राहिलं आहे. त्याचप्रमाणे भारतातील जीडीपी देखील वाढत आहे.  आणि दुसरं असं की डेमोक्रेटिक व्हॅल्यूज देखील तितक्याच महत्वाच्या आहेत. आणि हे सर्वात युनिक गोष्ट आहे. त्यामुळे भारत देशासाठी ही सर्वात मोठी गोष्ट आहे. 


भारतात सर्वात मोठी बाजार यंत्रणा असून डेमोग्रॅफिक डिविडेंड असलेला देश आहे. जर भारत हा आकर्षणाचा केंद्र आहे तर स्वाभाविकच इतर देशांना भारताशी संपर्क करायचा असणार. देशातील जनतेला केलेली प्रगती आणि त्यांचा उत्साह हा मला जगासमोर ठेवण्यात खरा गर्व वाटत आहे. 


प्रश्न : भारतात एफडीआय 36 बिलियनवरून 60 बिलियन झाले आहे. 2014 ते 2018 या वर्षांमध्ये भारताच्या स्टेटसमध्ये काय फरक आहे?


 


पंतप्रधान मोदी : 2014 नंतर जगाचा भारताशी थेट संबंध येत आहे. सर्वात मोठी गोष्ट ही आहे की, भारतात 30 वर्षानंतर बहुमत असलेली सरकार येणार आहे. आणि जगभरात याला सर्वाधिक महत्व असून हे अगदी पहिल्या दिवसापासून आपल्याला दिसत आहे. जेव्हापासून आमचं सरकार आलं तेव्हा भारत प्रत्येक घरात आणि जगभरात स्विकारलं जात आहे. 


ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये 142 वरून भारत 100 व्या रँकवर पोहोचला आहे. आणि ही सर्वात मोठी गोष्ट आहे. मोदींच्या शब्दात शक्ती आहे. तुम्हाला जे बहुमत मिळालं आहे त्यामधून हा विश्वास निर्माण केला आहे. जगभरातील सर्वात मोठ्या लोकतंत्राचा हा मॅनडेट महत्वाचा आहे मोदी महत्वाचे नाहीत. 125 करोड भारतीयांचा आवाज ऐकणं हे माझं काम आहे. 


प्रश्न : या अगोदरचे नेते फक्त फोटो सेशन करत असतं, मात्र तुमची स्टाइल वेगळी आहे तुम्ही मैत्री करता.


आता नेतन्याहू यांची भारतातील भेट आणि तुमची मैत्री यावर चर्चा होत आहे की, ही तुमची डिप्लोमसीची युनिक स्टाईल आहे. तुम्ही याच्याशी कसे कनेक्ट करता? 


 


पंतप्रधान मोदी : कधी कधी काही गोष्टी शक्तीमध्ये बदलून जातात. माझा मुळतः स्वभाव आहे की अॅडवसिटीला ऑपर्चुनिटीमध्ये कनवर्ट करणं. जेव्हा मी पंतप्रधान झालो तेव्हा लोकं असं म्हणत की याला जगाचं ज्ञान नाही. 


एका अर्थाने ते बरोबर होतं की, मला याचा कोणताच अनुभव नव्हता. पण माझ्यासाठी ही खूप मोठी संधी होती. माझ्याकडे कोणतं बॅगेज नव्हतं. मी प्रत्येकवेळी सांगतिलं आहे की, आपण अगदी सामान्य लोकांप्रमाणे आयुष्य जगायचं आहे. आणि आता ही स्टाइल जर जगाला पसंत पडली. माझा प्रयत्न हाच असतो की, देशाचं कुठेच नुकसान होणार नाही.