नवी दिल्ली : लोकसभा २०१९ च्या निवडणुकीतील सातही टप्प्यातील मतदान पूर्ण होताच सहा वाजता एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. या एक्झिट पोलनुसार पुन्हा मोदी सरकार येण्याचे संकेत मिळत आहेत. टाइम्स नाऊ- व्हीएमआरच्या एक्झिट पोलनुसार ५४२ पैकी भाजपप्रणित एनडीएला ३०६ जागांवर विजय मिळण्याची शक्यता. तर काँग्रेसप्रणित यूपीएला १३२ जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. तर एबीपी – नेल्सनच्या एक्झिट पोलनुसार भाजपप्रणित एनडीएला २६७, काँग्रेसप्रणित यूपीएला १२७, समाजवादी आणि बहुजन समाजवादी पार्टीला ५६ आणि अन्य पक्षांना ८४ जागांवर विजय मिळण्याची शक्यता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र  राज्यात  लोकसभेच्या ४८ जागा आहेत. यावेळी महाराष्ट्रात भाजपासह एनडीएने गेल्यावेळी ४२ जागांवर विजय मिळवला होता. मात्र, त्यांच्या या जागेत घट होताना दिसत आहे. तर याचा फायदा आघाडीला होताना दिसत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला ६ जागा मिळवता आल्या होत्या. मात्र, यंदाच्या टाइम्स नाऊच्या एक्झिट पोलनुसार, एनडीएला ३८ जागांवर विजय मिळेल तर युपीएच्या जागांमध्ये वाढ होऊन त्यांना १० जागा मिळू शकतील.



उत्तर प्रदेशमध्ये २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्षाला भोपळाही फोडता आला नव्हता. मात्र, यंदाच्या निवडणुकीत बसपा चांगले पुनरागमन करेल. बहुजन समाज पक्षाला ३० जागा मिळण्याची शक्यता. तर समाजवादी पक्षाला २६ जागांवर विजय मिळण्याची शक्यता. म्हणजेच महागठबंधनला ५६ जागा मिळतील. येथे भाजपला ८० पैकी ७२ जागा मिळाल्या होत्या.


तर टाइम्स नाऊ- व्हीएमआरचा एक्झिट पोलनुसार  ५४२ पैकी भाजपाप्रणित एनडीएला ३०६ जागांवर विजय मिळण्याची शक्यता. तर काँग्रेसप्रणित यूपीएला १३२ जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. इंडिया टुडे- अॅक्सिसच्या एक्झिट पोलनुसार गोव्यात दोन्ही जागा भाजपलाच मिळती. तर गुजरातमधील २६ जागांपैकी २५ जागांवर भाजपा तर एका जागेवर काँग्रेस विजयी होण्याची शक्यता आहे.


Exit Poll 2019 प्रमुख एक्झिट पोलचा अंदाज


- टाइम्स नाऊ – व्हीएमआर: एनडीए – ३०६, यूपीए- १३२, अन्य – १०४
-इंडिया न्यूज – एनडीए- २९८, यूपीए- ११८, अन्य – १२७


- रिपब्लिक टीव्ही या इंग्रजी वृत्तवाहिनीने दोन एक्झिट पोल केले आहेत. यातील एक एक्झिट पोल सीव्होटर तर दुसरा एक्झिट पोल ‘जन की बात’ चा आहे. त्यामुसार
- रिपब्लिक टीव्ही- सीव्होटर : एनडीए- २८७, यूपीए – १२८, अन्य – १२७
- रिपब्लिक टीव्ही – जन की बात: एनडीए- ३०५, यूपीए- १२४, अन्य – ८७


- एनडीटीव्ही: एनडीए- ३००, यूपीए- १२७, अन्य – ११५
- आयएएनएस- सी व्होटर: भाजप- २३६, काँग्रेस – ८० एनडीए- २८७
- नेता- न्यूज एक्स: एनडीए- २४२, यूपीए – १६४, अन्य – १३६
-  न्यूज १८ : एनडीए- २९२- ३१२, यूपीए – ६२- ७२
-  एबीपी – नेल्सन : एनडीए – २६७, यूपीए – १२७, अन्य १४८ (भाजप – २१८, काँग्रेस ८१)