Exit Poll 2022 : उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यातील विधान निवडणूकीची रणधुमाळी थांबली आहे. आज उत्तरप्रदेश निवडणुकीसाठी शेवटच्या म्हणजे सातव्या टप्प्यातलं मतदान पार पडलं. आता १० मार्चला मतमोजणी होणार असून या पाच राज्यात कोणाचं सरकार स्थापन होईल हे स्पष्ट होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंतिम निकाल येण्याआधी Exit Poll जाहीर करण्यात आले आहेत. झी मीडियाच्या Exit Poll नुसार मणिपुरमध्ये भाजपचची सत्ता येण्याची शक्यता आहे.


Exit Poll नुसार मणिपुरमध्ये भाजपाला ३२ ते ३८ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला अवघ्या १२ ते १७ जागांवर समाधान मानावं लागणारआहे.


मणिपुरमध्ये दोन टप्प्यात मतदान झालं होतं. त्यानंतर आता Exit Poll च्या अंदाजानुसार भाजपाल ३९ टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला ३० टक्के मत मिळण्याचा अंदाज आहे.


भाजप आणि काँग्रेसशिवाय NPF म्हणजे Naga People's Front नऊ टक्के मतं मिळू शकतात. 


NPP म्हणजे National People's Party ६ टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे.


मणिुपरमध्ये इतर पक्षांना १६ टक्के मिळण्याचा अंदाज आहे


10 मार्चला निकाल
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर, गोवा या राज्यांच्या निवडणुकांचे निकाल 10 मार्चला जाहीर होणार आहेत.