नवी दिल्ली : कांद्याचा तुटवडा केवळ भारतातच नव्हे तर, सोबत अनेक देशांमध्येही कांदा सर्वसामान्यांच्या डोळ्यातून पाणी काढत आहे. भारतासह बांगलादेश आणि मलेशियातही कांद्याचा तुटवडा आहे.


दिल्लीसोबत ढाक्यातही कांदा 80 रूपये किलो 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजधानी दिल्ली सोबत बांगलादेशची राजधानी ढाकामध्येही कांदा जवळपास 80 रूपये (बांगलातील चलनानुसा प्रति किलो 100 टका) किलोच्या वर गेला आहे. विशेष असे की, यापूर्वी बांगलादेशात कांदा कधीच इतका महाग झाला नव्हता. भारत हा कांदा निर्यातदार असलेल्या प्रमुख देशांपैकी एक म्हणून ओळखला जातो. परंतु, देशांतर्गत मार्केटमध्ये कांद्याच्या दर गेल्या पाच महिन्यात 7 टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे सरकारने कांदा निर्यातीची साधारण किंमत 850 डॉलर प्रति टन अशी केली आहे. जुलै महिन्या भारतातून कांदा सरासरी 186 डॉलर प्रति टन या दरात निर्यात झाला होता.


साधारण सर्वच देशांमध्ये ओरडण्याचा


दरम्यान, केवळ भारतच नव्हे तर, बांगलादेश, पाकिस्तान, मलेशिया आणि संयुक्त अरब अमीरातमध्येही कांद्याचा प्रश्न जटील बनला आहे. कांदा आयात करणाऱ्या देशामध्ये श्रीलंका, इंडोनेशिया आणि नेपाळ या देशांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही कांद्याची आवक मंदावल्याने हे देश आता चीन आणि इजिप्तच्या दिशेने डोळे लाऊन बसले आहेत. पण, महत्त्वाचे असे की, या देशांकडेही निर्यात करण्यासाठी पुरेसा कांदा नाही.