नवी दिल्ली: भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मोदी सरकारने TikTok सह ५९ चिनी 59 Chinese apps एप्लिकेशन्सवर बंदी घातली. मात्र, ही केवळ राजकीय कृती आहे. चीनला याचा फारसा आर्थिक फटका बसणार नाही, असा प्रतिवाद काहीजणांकडून केला जात आहे. परंतु, भारतातील चिनी Appच्या युजर्सची संख्या पाहता या सगळ्याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताकडून बंदी आणताच TikTok म्हणतं...


या क्षेत्रातील जाणकार तरुण पाठक यांनी 'झी मीडिया'शी बोलताना या सगळ्याचे विश्लेषण केले. त्यांनी म्हटले की, भारतामध्ये मे महिन्यात TikTok, Club Factory , UC Browser आणि अन्य चिनी Apps वरील एक्टिव्ह युजर्सची संख्या ५० कोटी इतकी होती. यामध्ये TikTok च्या १० कोटी युजर्सचा समावेश आहे. यापूर्वी २०१९ साली TikTok वर भारतात आठवडाभरासाठी बंदी घालण्यात आली होती. त्यावेळी TikTok विकसित करणाऱ्या ByteDance या कंपनीने कोर्टात धाव घेतली होती. या निर्णयामुळे दिवसाला आम्हाला पाच लाख डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागत असल्याची माहिती या कंपनीने दिली होती. 


TikTok आणि Heloला आणखी एक झटका


एका अहवालानुसार, २०१९ साली भारतीय युजर्सनी TikTok वर ५५० अब्ज तास घालवले. त्यामुळे या काळात भारतातील TikTokच्या एक्टिव्ह युजर्सची संख्या ८.१ कोटींपर्यंत जाऊन पोहोचली होती. तर Tiktok time spent च्या बाबतीत भारत जगात अव्वल ठरला होता. या यादीतील पुढील ११ देशांच्या एकत्रित युजर्सपेक्षा भारतातील युजर्सची संख्या अधिक होती. यावरुन TikTok च्या भारतातील व्यावसायिक उलढालीची कल्पना येऊ शकते. याशिवाय, गेल्या काही काळात Helo , Likee , Bigo Live ही चिनी Apps देखील भारतात झपाट्याने लोकप्रिय होऊ लागली होती. 

मात्र, दुसऱ्या बाजूला या चिनी Apps वरील बहुतांश क्रिएटर्स हे भारतीय आहेत. याशिवाय, या App कंपन्यांच्या भारतातील कार्यालयांमध्ये हजारो भारतीय काम करत आहेत. त्यामुळे आता ही Apps कायमची बंद पडली तर हजारो लोकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळू शकते.