Nephew Aunt Love Affair : प्रेम आंधळं असतं असं म्हणतात, पण अहो किती आंधळ...त्याला काही मर्यादा आहे की नाही? लग्न हे प्रेम विश्वासावर आणि जबाबदारीचं नातं आहे. एकमेकांच्या चुकांना सावरत सुख दु:खात साथ देत पुढे जायचं असतं. पण का कोण जाणे आज या नात्यांमध्ये सहज कोणी तिसरा येतो आणि त्या नात्याला ग्रहण लागतं. नवरा असो वा बायको दोघांनीही या नात्याला समर्पित राहायचं असतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रेमाला न वयाची मर्यादा असते ना रंग धर्माची...पण अहो नात्याची तर मर्यादा असावी ना...हे म्हण्यामागचं कारण म्हणजे एका घटनेने सगळ्यांची झोप उडाली आहे. दिराच्या मुलासोबत म्हणजे पुतण्यासोबत काकीचे प्रेम (Love Affair) प्रकरण उघड झाले आहे. सदर महिलाचा विवाह 2017 मध्ये झाला होता. लग्नानंतर जोडपे सुखी होते त्यांना एक मुलगाही झाला. हळूहळू प्रेमाने संसार सुरु होता. 4 वर्ष कोणाची नजर लागू नये असा हा संसार. पण त्यांचा संसाराला ग्रहण लागलं. (Extra Marital Affair news)


महिलेच्या मोठ्या दिराचा मुलगा (nephew love with his aunt) त्यांच्याकडे राहायला आलं. सुरुवातीला सगळं ठिक होतं. पण पुतण्या काकीचं प्रेम संबंध सुरु झाले. यादोघांचे सूर जुळले अन् एक दिवशी कुटुंबियांनी त्या दोघांना आक्षेपार्ह अवस्थेत (Physical relationship) रंगेहात पकडलं. 


समाजात अब्रुचे धिंडवडे निघतील म्हणून घरच्यांनी त्यांना खूप समजवलं. पण प्रेमात ते दोघे वेडे होते. ते कोणाचही ऐकायला तयार नव्हते. सगळ्या प्रकारे त्या दोघांना समजविण्यात आलं. समाजात त्यांच्याकडे कसे नावं ठेवले जातील हेही सांगण्यात आलं. पण हे दोघे कोणाचंही ऐकत नव्हतं. कसालाही उपयोग झाला नाही. (Extra Marital Affair nephew fell in love with his aunt uncle Caught red handed both got Physical relationship nephew aunt married bihar news )


अखेर हे प्रकरण पोलीस स्टेशनला पोहोचलं. महिलेने आपली मागणी महिला डेस्ककडे मांडली. पुतण्यालाही पोलिसांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले. दोघांनीही आपण प्रेम केलं असून आपल्याला लग्न करायचं आहे असं सांगितलं. पोलिसांनीही त्यांना सगळ्या प्रकारे समज दिला पण ते पोलिसांनाही जुमानत नव्हते. अख्खा दिवस निघून गेला पण या प्रकरणाचा काही निर्णय लागत नव्हता. अखेर पुण्याचा काकाने म्हणजे महिलेच्या नवऱ्याने त्या दोघांना परिसरातील हनुमान मंदिरात घेऊन गेला आणि तिथे त्या दोघांचं लग्न (nephew aunt married) लावून दिलं.  बिहारच्या भागलपूरमधील सुलतानगंजमध्ये मिरहटी गावातील या घटनेने सर्व परिसरातील लोकांना धक्का बसला आहे.