Crime News : लग्न झालेलं असताना बाहेर अनेक पुरूषांचे दुसऱ्या महिलेसोबत अफेर असतात. काहीवेळा ते समोर येतात तर काहीवेळा येत नाहीत. ज्यांचे समोर येतात त्यांचे तर संसार मोडल्याचं आपण पाहिलं आहे. असच एक प्रकरण समोर आलं आहे ज्यामध्ये एका पोलिसाचे तरूणपणी भाडेकरू महिलेसोबत अफेर होतं यादरम्यान तिने पोलिसाला चांगलाच गंडा घातला. (extra marital affair sub inspector affair with tenant wrote property marathi Crime News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकं काय आहे प्रकरण? 
आग्र्यामधील एका पोलिसाचे भाडेकरू महिलेसोबत संबंध होते. संबंधित महिलेने पोलिसाला आपल्या जाळ्यात ओढत काही रुपयांच्या बदल्यात करोडो रुपयांचं घर तिच्या नावावर करून घेतलं. त्यासोबतच तिने पोलिसाची जमीनही नावावर करून घेतली आहे. यासंदर्भात घरच्यांना काहीही माहिती नव्हतं. ज्यावेळी पोलीस निवृत्त होतो त्यावेळी त्याच्या पत्नीला याबद्दल माहिती समजते.


पोलिसाच्या पत्नीने आपल्या घरासाठी आणि मालमत्तेसाठी आमदारापासून ते उच्चपदस्थांच्या व्यक्तिंकडे फेऱ्या मारल्या. पण चतुर महिलेने मोठ्या शिताफीने सर्व गोष्टी रीतसर केल्या होत्या त्यामुळे काही फायदा झाला नाही. शेवटी वैतागलेल्या पोलिसाच्या पत्नीने कुलूप तोडून घरात गेली महिलेचे सर्व सामान बाहेर रस्त्यावर फेकून देत ते  पेटवून दिलं.


संपूर्ण गदारोळात आजूबाजूच्या लोकांनी निवृत्त पोलिसाच्या पत्नीला पाठिंबा दिला. या घरातील भाडेकरू आणि तिच्या पतीने पोलिसाला ब्लॅकमेल करत जमीन आणि घर नावावर करून घेतल्याचं शेजारच्या लोकांनी सांगितले. तीन तास रस्त्यावर हायप्रोफाईल ड्रामा सुरू होता. या नाट्यानंतर पोलिसांनी पोलीस अधिकाऱ्याची पत्नी आणि संबंधित महिलेला बाहेर काढलं. त्यानंतर घराला टाळा लावला. पोलीस पुढील तपास करत आहेत.