Extra Marital Affair: दोघांच्या नात्यात तिसऱ्याची एंट्री झाली की, नातं तुटायला वेळ लागत नाही. अशीच एक घटना समोर आली आहे. एका विवाहित तरुणाची वाट चुकली आणि पडला एका मुलीच्या प्रेमात. अनेकवेळा हा विवाहित तरुण त्या मुलीच्या घरी जात होता. याची कुणकुण तरुणाच्या पत्नीला लागली. पत्नी पतीच्या मागावर होती. काही झालं तरी पतीला रंगेहात पकडायचा निश्चय पत्नीने केला होता. अखेर त्या पतीला रंगेहात पकडलं ते सुद्धा नको त्या अवस्थेत.... 


नेमका प्रकार घडला कसा? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंजली आणि प्रवीणचं लग्न 11 जून 2014 रोजी झालं. लग्नाच्या सुरुवातीच्या काळात दोघांचे संबंध मधूर होते. काळ लोटत गेला. तसा प्रवीणचा स्वभाव बदलत गेला. प्रवीण आता पूर्वीसारखा राहिला नव्हता. पूर्वी वेळेआधी घरी येणारा प्रवीण घरी उशीरा येऊ लागला. घरी आल्यानंतर प्रवीण सतत चीडचीड करत होता.घरात चीडचीड करणाऱ्या प्रवीणचं मन शेजारी राहणाऱ्या एका तरुणीत गुंतलं होतं. तो तिच्या घरी वारंवार जात होता. तिच्यासोबत गोडगोड बोलायचा. हे पाहून प्रवीणच्या पत्नीच्या मनात शंकेचे पाल चुकचुकली. मनात शंकेनं घर केलं. मनात आलेली शंका किती सत्य आहे हे तपासायचं तिने ठरवलं. ती प्रवीणच्या मागावर होती. एक दिवस प्रवीण शेजारी राहणाऱ्या तरुणीच्या घरी गेला. प्रवीण तरुणीसोबत प्रेमरसात बुडाला होता. पुढे काय होणार? याची कल्पना त्याला थोडी सुद्धा नव्हती. याच सुमारास पत्नी अंजलीच्या माहेरची मंडळी देखील अंजली घरी आली होती. पतीला रंगेहात पकडाचं तिने ठरवलं. अंजली थेट उठली आणि शेजारी राहणाऱ्या मुलीच्या घराचा दरवाजा ठोठावला. बराचा वेळ आतून काही प्रतिसाद आला. कसा बसा दरवाजा उघडला. पत्नी अंजली रागाने घरात घुसली. पतीचा शोध घेऊ लागली. पती प्रवीण घरात दिसेनासा झाला. खूप वेळ शोध घेतल्यानंतर पत्नी अंजलीने त्या तरुणीचा बेड उघडला.बेड उघडताच सर्वांना धक्का बसाला. बेडच्या आतमध्ये पती प्रवीण अर्धनग्न अवस्थेत लपून बसला होता. 



घडल्या प्रकाराचा पुरावा म्हणून अंजलीने व्हिडीओ शूट केला आहे. अंजलीने हा व्हिडीओ पोलिसांना दाखवत नवऱ्याला धडा शिकवण्याची मागणी केली आहे. ही सगळी घटना उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यातील आहे.