ExtraMarital Affair: आई बाळाला नऊ महिने पोटात वाढवते, नवं आयुष्य देते, दुध देते, पालन पोषण- संगोपन करते. दुनियेची ओळख करवून देते. त्यामुळे आई सर्वश्रेष्ठच असते. पण आईच्या व्याख्येला  कलंकित करणारी घटना समोर आली आहे. ज्या बाळाला नऊ महिने आपल्या गर्भात ठेवले. त्यानंतर 7 वर्षे संगोपन केले, त्या बाळाला स्वत:च्या अनैतिक संबंधामुळे संपवण्याचे कृत्य एका आईने केले आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे. कुठे आणि कसा घडलाय हा प्रकार? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंजू देवी असे अनैतिक संबंधांमुळे बाळाला मारणाऱ्या आईचे नाव आहे. ती लच्छीपूर बिहार गावातील रहिवासी आहे. कमलेश विश्वकर्मा असे तिच्या पतीचे नाव आहे. तर अमित विश्वकर्मा असे 7 व  3 महिन्यापुर्वी अंजू देवीचे अनैतिक संबंध समोर आले होते. यानंतर तिने आपल्या हृदयाचा तुकडा मारेकऱ्यांना सोपावला. आता ती तुरुंगात गेली. एवढं सगळ करुन आता अंजू देवीला ना मुलगा मिळाला, ना प्रियकर मिळाला, ना तिला चांगला संसार मिळाला.
 
लच्छीपूर बिहार गावात राहणाऱ्या कमलेश विश्वकर्मा यांच्यासाठी 14 फेब्रुवारी हा दिवस आयुष्यातील वाईट दिवस ठरला. त्यांचा 7 वर्षांचा मुलगा अमित विश्वकर्मा हा त्यादिवशी आई अंजू देवीसोबत मावशीच्या घरी लग्नासाठी जलालपूर  येथे गेला होता. तेथून तो अचानक गायब झाला. मुलगा गायब झाल्याची गावभर चर्चा झाली. 7 वर्षाचा मुलगा म्हणजे ज्याला स्वत:चा नाव, पत्ता सांगू शकेल इतका हुशारदेखील होता. 


वडिलांना आला संशय 


त्यामुळे वडील कमलेश यांना संशय आला. त्यांनी लगेचच पोलिसात याबद्दल तक्रार केली. पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांनी अमरेशला प्रयागराज येथून पकडले.  त्याची चौकशी केली. सुरुवातील तो काही सांगायला तयार नव्हता पण पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर अमरिश धडाधडा बोलू लागला. त्याने धक्कादायक खुलासे केले. त्यातून समोर आलेली माहिती ऐकून कमलेश विश्वकर्माच्या पायाखालची जमीन सरकली. 


स्वत:चे अनैतिक संबध लपवण्यासाठी 


अमितची आई अंजू देवीसोबत अमरिशचे अनैतिक संबंध होते. अमरिश आणि अंजू देवीला मुलाने एकदा पाहिले होते. मुलगा घरी येऊन आपल्या वडिलांना याबद्दल सांगेल याची भीती अंजू देवीला होती. आपल्या या कथित अनैतिक प्रेमप्रकरणाचे रहस्य उलगडू नये म्हणून अंजू आणि अमरिश दोघांनी मिळून 
अमित आणि कमलेश दोघांना संपवण्याचा निर्णय घेतला. 


500 रुपयांसाठी हत्या 


यासाठी प्लानिंग करण्यात आले. प्लानिंगनुसार अंजूने अमरेशला 14 तारखेला फोन केला. बाप आणि लेकाला एकाचवेळी मारण्याची हीच संधी असल्याचे तिने अमरेशला सांगितले. लोक कार्यक्रमात व्यस्त असतील तेव्हा आपले काम होईल असे दोघांना वाटले. त्यामुळे अमरेश जलालपूर गावात पोहोचला. त्याने गावातील मित्र अक्षय, करण, सुमित आणि धीरज यांना सोबत घेतले. त्यांना 500 रुपये देण्याचे आमिश दाखवले. यानंतर अंजू देवी आपला मुलगा अमित विश्वकर्मासोबत रस्त्यावर आली. तिने आपल्या मुलाला अक्षय आणि करणच्या मोटारसायकलवर बसण्यास सांगितले.


चिमुरड्याचा मृतदेह पुरला 


पूर्वनियोजित प्लॅननुसार या लोकांनी मुलाला भैंसासुर नाल्याच्या मागे नेले आणि त्याचा गळा दाबून खून केला. नाल्याजवळ खड्डा खणण्यात आला. दिवसाढवळ्या चिमुकल्या अमितचा मृतदेह पुरण्यात आला. अमरिशने पोलिसांना मृतदेह कुठे पुरला याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी या घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला आणि पोस्टमार्टमसाठी पाठवला. अंजू देवी, करण गौतम, सुमित विश्वकर्मा, अक्षय सरोज यांनाही पोलिसांनी अटक केली. धीरज हा आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.