Viral Video: देशभरात विवाहित महिलांनी मोठ्या उत्सावात करवा चौथ ( Karwa Chauth) साजरी केली. बॉलिवूडमध्ये यावर्षी कटरीना कैफ (Katrina Kaif), आलिया भट्ट (Alia Bhatt) यांची पहिली करवा चौथ (First Karwa Chauth) होती.अभिनेता अनिल कपूरच्या (Anil Kapoor) घरी बी टाऊनमधील अभिनेत्रींनी (Bollywood Wives) करवा चौथ धुमधडाक्यात साजरी केली. जिथे करवा चौथसाठी महिला नटतथटत होत्या आपल्या नवऱ्याचा दीर्घ आयुष्यासाठी उपवास करत होत्या अशात एक महिलेच्या आयुष्यात मोठ्या भूंकप झाला. 


आणि क्षणात सगळंच संपलं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करवा चौथच्या शॉपिंगसाठी एक महिला बाजारात गेली होती. त्या महिलेने कधी विचार केला नव्हता की, पुढच्या क्षणात तिच्या आयुष्यात वादळ येईल ते...शॉपिंग करत असताना अचानक त्या महिलेला तिचा नवऱ्या दिसतो. तोही करवा चौथसाठी शॉपिंग करत होता पण हा महाशय पत्नीसाठी गिफ्ट घेत नसून आपल्या गर्लफ्रेंडसोबत शॉपिंग करत होता. हो, पत्नीला सोडून हा व्यक्ती आपल्या गर्लफ्रेंडसोबत करवा चौथची तयारी करत होती. (extramarital affair karwa chauth man shopping girlfriend viral wife beat video viral on Social media nmp)


भरदिवसा नवऱ्याला दाखवला चंद्र


नवऱ्याला दुसऱ्या मुलीसोबत रंगेहात पडकल्यावर महिलेने आपल्या नातेवाईकांना बाजारात बोलवून घेतं आणि पुढे जे घडलं त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) तुफान व्हायर (Viral Video)ल होतो आहे. या महिलेने नवरा आणि त्याचा प्रेयसीला भरबाजारात दिवसाढवळ्या चंद्र दाखवला. दुखावलेल्या पत्नीने पतीला बाजारातच धो धो धुतलं. तिथे असलेल्या कोणीतरी या घटनेचा व्हिडीओ काढला आणि तो आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. 



कुठे घडली घटना


उत्तर प्रदेशातील  (Ghaziabad) गाझियाबादमध्ये (Delhi) ही घटना घडली आहे. गाझियाबादच्या कोतवाली भागातील तुराब नगर (Turab Nagar) मार्केट हा सगळ्या गोंधळ झाला. विशेष म्हणजे या महिलेने आपल्या पतीविरोधात पोलिसात लेखी तक्रारदेखील केली आहे. या महिलेचं 2017 मध्ये लग्न झालं होत. तिचं आणि तिच्या नवऱ्यांचं काही वर्षांपासून वाद सुरु असून हे प्रकरण न्यायालयात गेलं आहे. त्यानंतरही हा महाशय आपल्या प्रेयसीसोबत मार्केटमध्ये फिरत होता.