दिसपूर : आसाममध्ये मुसळधार पावसामुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे आसाममधील अनेक गावं पूराच्या पाण्याखाली गेली आहेत. पुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. आसाममधील पूरात आतापर्यंत २६ जणांचा बळी गेला आहे.


आसाममधील जवळपास १५ जिल्ह्यांना पूराचा वेढा बसला असून ५ लाख नागरिकांना याचा फटका बसला आहे. मृतांच्या नातेवाईकांना आसामच्या मुख्यमंत्र्यांनी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. दरम्यान आसाममधील या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी तात्काळ आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोबाल यांच्याशी चर्चा केली. पूरस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारला सर्वोतोपरी मदत करण्यास तयार असल्याची ग्वाही मोदींनी यावेळी सोनोवाल यांना दिली आहे.