भोपाळ : कोरोना आपल्यासोबत अनेक चिंता आणि प्रश्न घेऊन आला. लॉकडाऊनने प्रत्येक माणसाला हतबल केलंय. बेरोजगारीने पुन्हा एकदा डोकं वर केलंय. या बेरोजगारीने एक संसार उद्धवस्त केला आहे. बेरोजगार इंजिनिअरने आर्थिक तंगी आणि तणावामुळे टोकाचं पाऊल उचललं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंजिनिअर असूनही नोकरी नाही. आर्थिक तंगी आणि तणावामुळे टोकाचं पाऊल उचललं. पत्नीसोबत विष प्राशन करून इंजिनिअरने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यासोबतच जन्म दिलेल्या दोन पिल्लांना स्टोन कटरने हत्या करण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यात चौघांचा सुखी संसार कोलमडला. होत्याच नव्हतं झालं. या घटनेत इंजिनिअर बाप आणि मुलाचा मृत्यू झाला आहे. तर पत्नी आणि मुलीची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. 



भोपालमधी एक कुटुंब आर्थिक परिस्थितीने ग्रस्त होतं. कुटुंबाच्या प्रमुखाकडे आत्महत्या करण्या व्यतिरिक्त काहीच पर्याय उरला नव्हता. पती-पत्नीने विष पिऊन स्टोन कापणाऱ्या मशिनने मुलांची हत्या केली. मुलाचा यामध्ये तात्काळ मृत्यू झाला पण मशिन खराब झाल्याने मुलगी बचावली आहे.  


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी ठाकरे इंजिनिअर होते. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून ते बेरोजगार होते. यामुळे त्यांनी 50 वर्षीय पत्नी रंजना ठाकरे, 16 वर्षीय मुलगा आणि 14 वर्षीय मुलीची हत्या केली.