मुंबई : आपण सकाळी उठल्या-उठल्या सर्वात पहिलं काम करतो, ते म्हणजे आपले दात किंवा तोंड साफ करणे. यासाठी प्रत्येकाची पद्धत वेगळी असते आणि प्रत्येकजण आपआपल्या सोयीप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची टूथपेस्ट वापरतात. परंतु तुम्ही कधी तुमच्या टूथपेस्टला नीट पाहिलंय का? त्याच्यावर त्याच्या महत्वाप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे चिन्ह बनवलेले असते. तसेच त्यावर वेगवेगळ्या रंगाचे ब्लॉक बनवले जातात. जसे की, लाल, हिरवा, निळा आणि काळा परंतु हे असं का बनवलं जातं, याचा कधी विचार केलाय? या प्रत्येक रंगाचं स्वत:चं एक महत्व आहे आणि तेच स्पष्ट करण्यासाठी टूथपेस्ट बनवणाऱ्या कंपन्या त्यावर असे कलर ब्लॉक बनवतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही टूथपेस्ट इतरांपेक्षा किती वेगळी आहे? हे ते रंग सांगतात. जाणून घ्या, टूथपेस्टच्या ट्यूबवर वेगवेगळ्या रंगांच्या ब्लॉक्सचा अर्थ काय?


सर्वप्रथम, टूथपेस्ट ट्यूबवर बनवलेल्या लाल रंगाच्या ब्लॉकबद्दल बोलूया. नैसर्गिक आणि रासायनिक अशा दोन्ही गोष्टींचे मिश्रण करून ही टूथपेस्ट तयार करण्यात आली आहे. जर तुम्ही फक्त नैसर्गिक गोष्टींपासून तयार केलेली टूथपेस्ट वापरत असाल तर ही टूथपेस्ट तुमच्यासाठी नाही.


जर टूथपेस्टवर हिरव्या रंगाचा ब्लॉक असेल, तर याचा अर्थ असा होतो की ती फक्त नैसर्गिक घटकांपासून बनवले गेले आहे. जर तुम्हाला रासायनिक गोष्टी आवडत नसतील तर अशा प्रकारची टूथपेस्ट वापरणे हा एक उत्तम पर्याय आहे.


जर ट्यूबवर निळा ब्लॉक असेल, तर ते नैसर्गिक घटक आणि औषधांपासून तयार केले गेले असल्याचे सूचित करते. डॉक्टर विशिष्ट परिस्थितीत या प्रकारची पेस्ट वापरण्याची शिफारस करतात. त्यामुळे ते वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.


त्याच वेळी, ब्लॅक ब्लॉक म्हणजे ही टूथपेस्ट केवळ रसायनांपासून तयार केली गेली आहे. त्यामुळे तुमच्या सोयीनुसार तुम्ही वेगवेगळ्या रंगांच्या ब्लॉक पेस्टमधून तुमची पेस्ट निवडू शकता.


आता तुम्हाला या सगळ्या टूथपेस्टच्या रंगाबद्दल आणि त्याची ओळख पटवण्याबाबत आम्ही तुम्हाला माहिती दिली आहे, ज्याच्यामुळे आता पुढच्यावेळी टूथपेस्ट घेताना तुमच्यासाठी योग्य टूथपेस्ट निवडणं सोपं होईल.