Fact Check | शेकडो फूट उंचीवरुन पूलाखाली उडी, पाहा काय आहे सत्य
आपल्याकडे लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी कोण काय करेल, याचा नेम नाही. प्रसिद्धीसाठी आणि विविध हेतूने काही अतिउत्साही मंडळी असं काही करतात, की ते पाहून आपल्या काळजाचा ठोका चुकतो.
मुंबई : आपल्याकडे लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी कोण काय करेल, याचा नेम नाही. प्रसिद्धीसाठी आणि विविध हेतूने काही अतिउत्साही मंडळी असं काही करतात, की ते पाहून आपल्या काळजाचा ठोका चुकतो. याला नेमकं धाडसं म्हणायचं की मुर्खपणा असा प्रश्न तुम्हाला हा व्हायरल होणारा व्हीडिओ पाहून नक्कीच पडेल. (fact check a man jumped out of a speeding car under a bridge do not try this stunt)
या व्हायरल झालेल्या व्हीडिओत एक तरुण वेगात असलेल्या गाडीवर बसलेला दिसतो. ही वेगात असलेली गाडी पूलावर आल्यानंतर ही व्यक्ती गाडीच्या टपावरुन पूलाखाली जोरात अलटीपलटी मारत उडी टाकतो. स्टंट करण्यासाठी आपला जीव धाोक्यात घालतो. आपल्या काही जणांना उंचीचा फोबिया असतो. उंचावरुन खाली पाहताना काही जणजण थरथर कापतात.
मात्र या व्हीडिओत उडी मारताना पाहून तुमचा थरकाप नक्की उडेल हे खरं. मात्र तुम्ही असलं काही करण्याचं धाडसं करु नका, असं आवाहन आम्ही करतोय.