Fact Check: 15 ऑगस्ट रोजी खरंच पक्षाने फडकावला तिरंगा? 2 चमत्कारिक व्हिडीओ पाहून वाटेल आश्चर्य!
Independence Day Viral Video : हे दोन्ही व्हिडीओ पाहून त्या ठिकाणी नेमकं काय घडलं? याचा तुम्हाला अंदाज लावता येईल.
Independence Day Viral Video : 15 ऑगस्ट रोजी देशभरात ध्वजारोहण करण्यात आले. विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. यातील एका व्हिडीओने साऱ्यांचे लक्ष वेधले. कारण येथे चक्क एका पक्षाने येऊन ध्वजारोहण केल्याचे वृत माध्यमांतून समोर आले. असा एक व्हिडीओदेखील व्हायरल झाला. त्यानंतर सर्वांच्या मनात या पक्षाबद्दल उत्सुकता निर्माण झाली. निसर्गाचा चमत्कार असे या व्हिडीओला म्हटले गेले. दरम्यान नेमकं हे प्रकरण काय होतं. याचा मागोवा आम्ही घेतला. यात आणखी एक व्हिडीओ आमच्या निदर्शनास आला. हे दोन्ही व्हिडीओ पाहून त्या ठिकाणी नेमकं काय घडलं? याचा तुम्हाला अंदाज लावता येईल.
काय होतं व्हिडीओत?
प्रशांत भामरे या ट्विटर हॅंडलवरुन यासंबंधीचे 2 व्हीडीओ ट्विट करण्यात आले आहेत. ते पाहून तुम्हाला या प्रकरणातील स्पष्टता येऊ शकते. पहिल्या व्हिडीओत पक्षी येऊन ध्वजारोहण करताना दिसतोय. तर दुसऱ्या व्हिडीओत पक्षी येऊन बाजुच्या नारळाच्या झाडावर बसलेला दिसतोय आणि तितक्यात ध्वज फडकतोय. 2 वेगळ्या कॅमेरा अॅंगलचे 2 व्हिडीओ तुम्हाला पाहता येतील.
निष्कर्ष काय?
सोशल मीडियात अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण कोणत्याही बाबीची प्रत्यक्ष पडताळणी केल्याशिवाय कधीही विश्वास ठेवू नये असेच यातून स्पष्ट होते.