FACT CHECK : सध्या असा दावा करण्यात येतोय की, तुमच्याकडे असलेल्या 2 हजारांच्या (2000 notes) नोटा लगेच बँकेत जमा करा आणि जर बँकेत नोटा जमा केल्या नाहीत तर त्याचा मोबादला तुम्हाला मिळणार नाही. पुन्हा 2 हजाराची नोट जमा करण्यासाठी बँकेनं काही मर्यादा घातल्यायत, असा दावा करण्यात आलाय. त्यामुळे आम्ही याची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. या मेसेजमध्ये आणखी काय दावा केलाय पाहूयात


काय आहे व्हायरल मेसेज?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2023 या वर्षात 1 हजारची नोट पुन्हा सुरू होणार आहे. आता 2 हजारांच्या नोटा बँक परत मागवणार आहे. प्रत्येक व्यक्तीला फक्त 50 हजार रूपयांच्याच नोटा खात्यात जमा करण्याची मुभा असेल. त्यामुळे 2 हजारांच्या नोटा आताच बँकेत जमा करा.


हा मेसेज व्हायरल होत असल्याने याची खरी माहिती सगळ्यांना मिळायला हवी. हा पैशांचा विषय असल्याने आम्ही आरबीआयकडून अधिक माहिती मिळवली आहे, त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूयात...



हा दावा करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. लोकांना अशी चुकीची माहिती देऊन त्यांची दिशाभूल केली जातेय पण, आमच्या पडताळणीत 2 हजारांची नोट 2023 सालात बंद होणार आणि 1 हजारची नोट सुरू होणार हा दावा असत्य ठरला आहे.


  • सरकार 1 हजारची नोट पुन्हा लॉन्च करण्याच्या विचारात नाही 

  • 2 हजारांची नोट बँकेत जमा करण्याच्या सूचना दिलेल्या नाहीत 

  • 2023 मध्ये 2 हजारांची नोट बंद होणार नाही