Viral Video : बातमी आहे एका (Viral Video) व्हायरल व्हीडिओची. दसऱ्याला रावणाचं दहन (Ravan Dahan) करण्यात आलं, पण असे काही रावण होते त्यांनी लोकांवरच हल्ले केलेयत. रावणाच्या हल्ल्याचे व्हीडिओ आता व्हायरल झालेयत.नक्की रावणांनी लोकांवर हल्ला कसा केला? चला पाहुयात. (fact check viral polkhol a major accident was averted during ravan dahan in yamunanagar)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दसऱ्याला रावणाचं दहन केलं खरं, पण या रावणानं मात्र, लोकांनाच सळो की पळो करून सोडलं. या व्हिडिओत बघा, या रावणाला लोकांनी पेटवला. पण, या रावणानेच लोकांवर रॉकेटहल्ला केला. रावण जाळायचा असल्याने यात फटाके भरले होते. याला जाळताच आग भडकली आणि फटाके फुटले. बघता बघता रावणात ठेवलेले रॉकेट जमावाच्या दिशेनं उडू लागले. रॉकेटचा मारा इतका भयानक होता, की लोकांना पळता भुई थोडी झाली. रॉकेट हल्ल्यातून वाचण्यासाठी लोक सैरावैरा पळत होते. पण, गर्दीच एवढी होती की लोकांना पळणंही अवघड झालं. याच वेळी रावणाने दणादण एका मागून एक असा रॉकेटचा मारा केला. या सगळ्या गोंधळात लोकांसह पोलीसही भाजलेयत. हा आगीचा थरार उत्तर प्रदेशातल्या मुजफ्फरनगरमधला आहे.



तर अशीच एक घटना हरियाणातही घडली.या रावणाला लोकांनी जाळला. पण, हा पेटता रावण लोकांच्या अंगावर कोसळला. रावण खाली कोसळत असल्याने लोकांनी वेळीच पळ काढला म्हणून मोठी दुर्घटना टळली. तरीदेखील काहीजण थोडे थोडके भाजलेच. हे व्हिडिओ आता व्हायरल होत असून, रावणानेच लोकांवर हल्ला केलाय अशी चर्चा सोशल मीडियावर सुरूये.