Fact Check : आकाशातून एलियन आले की अंतराळ पर्यटनाचं टेस्टिंग?
हा फुगा खाली खाली आला त्यावेळी अज्ञात एलियन शिपसारखा दिसू लागला आणि पुन्हा एकदा एलियन आल्याच्या चर्चांना उधाण आलं.
Viral News : बातमी आहे एका व्हायरल व्हीडिओची. आकाशातून एलियन (aliens) उतरले असा दावा करणारा व्हीडिओ व्हायरल करण्यात आला. काही मिनिटातच हा (Viral Video) व्हीडिओ व्हायरल झाला आणि चर्चांना उधाण आलं. नक्की हे एलियन आहेत की दुसरं काही? याची आम्ही पडताळणी केली. मग काय पोलखोल झाली. 7 डिसेंबरचा दिवस होता. वेळ सकाळी 7.30 वाजताची. आकाशात उडणारा भलामोठा फुगा दिसला आणि सगळ्यांचीच तारांबळ उडाली. हे सगळं सुरू होतं हैदराबादमध्ये. अनेकांना आधी वाटलं हा फुगा कुठल्यातरी जाहिरातीचा भाग असावा. पण, हा फुगा खाली खाली आला त्यावेळी अज्ञात एलियन शिपसारखा दिसू लागला आणि पुन्हा एकदा एलियन आल्याच्या चर्चांना उधाण आलं. (fact check viral polkhol aliens come on earth know what true what false)
हैदराबादपासून 100 किमी अंतरावर असलेल्या विकराबादच्या मोगलीगुंडला गावच्या शेतात हा फुगा पडला. गोल स्पेसशिपसारखी दिसणारी ही वस्तू पाहण्यासाठी शेकडो लोक जमले. पण, आधी कुणालाच काही कळेना. सगळीकडे कॅमेरे आढळले. आकाशातून एलियन तर आले नाहीत ना याचीच चर्चा होती. पण, हैदराबादच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या बलून विभागाचे शास्त्रज्ञ आले आणि हे नक्की काय आहे ते स्पष्टपणे सांगून टाकलं. हे स्पेसशिप किंवा एलियन नसून स्पेस कॅप्सूल आहे. हे स्पेस कॅप्सूल कसं आहे तरी कसं ते पाहुयात.
स्पेस कॅप्सूल नक्की आहे तरी काय?
स्पेस कॅप्सूलमुळे अंतराळ फिरता येणं शक्य. स्पेस कॅप्सूलमधून 8 प्रवाशांना अंतराळात नेता येतं. स्पेस कॅप्सूल 6 तासांत जमिनीपासून 40 किमी अंतरावर जाते. अवकाशातून पृथ्वीचे कशी आहे ते पाहायला मिळेल. दौऱ्यापूर्वी प्रवाशांना प्रशिक्षण दिलं जातं. कंपनीचे प्रशिक्षित क्रू मेंबर्स मदतीसाठी असतील.
पुढील 4 महिन्यांत आणखी 9 प्रयोग होतील. यामुळे लवकरच लोक अशा फुग्यांमध्ये अंतराळात जाऊ शकतील. ही कंपनी 2025 मध्ये व्यावसायिक उड्डाण सुरू करेल. यासाठी लागणारं 1 कोटी 6 लाख रुपयांचं भाडं सामान्यांना परवडणारं नाहीये. पण, भविष्यात याची किंमत नक्कीच कमी होईल आणि अंतराळात जाण्याचं अनेकांचं स्वप्न पूर्ण होईल यात शंकाच नाही.