Fact Check | कोल्डिंक्सची सवय दारूपेक्षाही वाईट?
तुम्ही कोल्ड्रिंक जास्त प्रमाणात पित असाल तर तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास होऊ शकतो असा दावा करण्यात आलाय.
अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : बातमी आहे एका व्हायरल मेसेजची. तुम्ही कोल्ड्रिंक जास्त प्रमाणात पित असाल तर तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास होऊ शकतो असा दावा करण्यात आलाय. अनेकजण कोल्ड्रिंक पित असल्याने आम्ही याची पडताळणी केली. मग काय पोलखोल झाली हे जाणून घेऊयात. (fact check viral polkhol drinking more cold drinks increases the risk of kidney stones)
दावा आहे की कोल्ड्रिंक्स अधिक प्रमाणात प्यायल्याने किडनी स्टोनचा धोका अधिक वाढतो. घशाला थोडंसं गारेगार वाटावं म्हणून कोल्ड्रिंग अनेकजण पितात. काहीजण अन्नपचन व्हावं म्हणून जेवल्यानंतरही कोल्डिंक्स पितात. हा आरोग्याचा विषय असल्याने आम्ही या दाव्याची पडताळणी सुरू केली. पण, मेसेजमध्ये काय दावा केलाय ते आधी पाहुयात.
साखरयुक्त कोल्ड्रिंक्स किंवा सोडा प्यायल्यामुळं मूत्रपिंडाचे विकार जडतात. अतिप्रमाणात कोल्ड्रिंक्सचं सेवन केल्यानं किडनी स्टोन आणि मधुमेहाची शक्यता वाढते.
या दाव्याची पोलखोल करण्यासाठी आमचे प्रतिनिधी अरुण मेहेत्रे हे किडनीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना भेटले. त्यांना व्हायरल मेसेज दाखवला आणि त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय पोलखोल झाली पाहा.
व्हायरल पोलखोल
साखरयुक्त कोल्ड्रिंक्समध्ये कार्बोनायजेशनसाठी फॉस्फरिक ऍसिडचा वापर करतात. अतिप्रमाणात सेवन केल्यानं किडनी स्टोन आणि मधुमेहाची शक्यता वाढते. साखरेतील काही घटक किडनीच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतात.
त्यामुळं जास्त प्रमाणात कोल्ड्रिंक्स पित असाल तर टाळावं. आमच्या पडताळणीत कोल्ड्रिंक्स प्यायल्यानं किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो हा दावा सत्य ठरला.