अमर काणे, झी मीडिया, नागपूर : व्हायरल पोलखोलमध्ये (Viral Polkhol) गॅसवरील इस्त्रीची आम्ही पोलखोल केलीय. एक व्यक्ती गॅसवरील इस्त्रीने कपड्यांची इस्त्री करतेय. पण, ही गॅस इस्त्री करताना स्फोट होऊन धोका निर्माण होऊ शकतो असा दावा करण्यात आलाय. त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली. मग काय पोलखोल झाली चला पाहुयात.   (fact check viral polkhol gas iron know what truth and what false)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दावा आहे की, गॅसवरील इस्त्री करणं धोक्याचं ठरू शकतं. कधीही स्फोट होऊ शकतो असा दावा करण्यात आलाय. त्यामुळे गॅसवरील इस्त्री वापरणाऱ्यांच्या मनात भीती निर्माण झालीय. या व्हिडिओत पाहा, एक व्यक्ती गॅस इस्त्रीने कपड्यांची इस्त्री करतेय. पण, खरंच गॅसवरील इस्त्री बाजारात आलीय का? 



ही इस्त्री धोक्याची ठरू शकते का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आणि व्हायरल दाव्यामागची पोलखोल करण्याचा आमच्या व्हायरल टीमनं पडताळणी सुरू केली. 


आमचे प्रतिनिधी अमर काणे हे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना भेटले. त्यांना व्हायरल व्हिडिओ दाखवला आणि खरंच ही इस्त्री सुरक्षित आहे का,  हे जाणून घेतलं. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय पोलखोल झाली पाहुयात.


व्हायरल पोलखोल


गॅसवरील इस्त्री ही मार्केटमध्येही उपलब्ध आहे.  मान्यता प्राप्त इस्त्री असेल तर धोका नाही. सुरक्षित डिव्हाईस वापरण्यास हरकत नाही. एलपीजी यंत्रांचा वापर करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 


गॅसवरील इस्त्री हा प्रकार नवा नाहीये. अनेकजण गॅसवरील इस्त्री वापरतात. त्यामुळे मान्यताप्राप्त इस्त्री असल्यास कोणताही धोका नाही. पण, स्वत:  जुगाड करून बनवलेली गॅस इस्त्री बनवल्यास धोका निर्माण होऊ शकतो.