अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : बातमी आहे एका व्हायरल व्हिडिओची. तुम्ही कधी शिंगंवाला साप पाहिलाय का? शिंग असलेल्या सापाचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतोय. हा साप विषारी असल्याचा दावा केला जातोय. पण खरंच या दाव्यात तथ्य आहे का? याची आम्ही पोलखोल केली. मग काय सत्य समोर आलं चला पाहूयात. (fact check viral video snake horns know what true what false)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिंग असलेल्या या सापाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. 1 मिनीट 21 सेकंदाच्या या व्हिडिओत शिंग असलेला साप दिसतोय. सापाला शिंग असल्याचा दावा करण्यात आलाय. पण सापाला खरंच शिंग आहे का? हा विषारी साप असल्याचाही दावा केल्यानं आम्ही याची पोसखोल केली. आता हा व्हीडीओ पहा. नीट पाहिलं तर सापाने  बेडून पकडल्याचं स्पष्ट दिसतंय. 



शेतात काम करणाऱ्या मजुराने या सापाला पाहताच साप बेडकाला घेऊन पळून जात होता. पण ह्या सापाला शिंगासारखे काही तरी दिसतंय. त्यामुळे हा शिंगवाला साप आहे तरी कोणता? खरंच हा शिंगवाला साप विषारी आहे का? हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली हा व्हिडिओ सर्पमित्र आणि वन्यजीव अभ्यासकांना दाखवला.


त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं ते पाहा. व्हिडिओ दिसणारा साप नाणेटी जातीचा आहे. पावसाळ्यात जास्त प्रमाणात आढळतो. बिनविषारी साप असून बेडूक उंदीर माशांची शिकार करतो.  बेडकाला पकडल्यामुळे बेडकाचे पाय शिंगांसारखे दिसतायत. 


सापाने बेडकाची शिकार केलीय. बेडकाचे पाय शिंगासारखे दिसतायत.हा शिंगवाला साप असल्याचा दावा आमच्या पडताळणी असत्य ठरला.. हा व्हिडिओ अमरावतीच्या असून आता व्हायरल होतोय त्यामुळे अशा व्हिडिओवर विश्वास ठेवू नका.